शिवरायांच्या सरदारांच्या घरांचेही होणार संवर्धन
सरकारने नेमली १६ जणांची समिती; सरदारांच्या वारसांचाही समावेश
पुणे प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांनी घडविलेल्या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये सिंहाचा वाट असणाऱ्या त्यांच्या सरदारांच्या घरांची ऐतिहासिक वास्तु, त्यांचे शत्र व दस्तांचे संवर्धन करण्याच निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी पुरातत्व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक कार्य विभागाने सोळा जणांची समिती स्थापन केली आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रधान सचिवांनी दिलेल्या निर्देशानुसार पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या संचालकांनी समिती स्थापनेबाबतचा प्रस्ताव सादर केला होता, त्यानुसार १६ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत लढाईत सहभागी झालेल्या सरदारांच्या १० वारसदारांचाही समावेश करण्यात आला आहे.
पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक हे या समितीचे अध्यक्ष असून संचालनालयाचे उपसंचालक हे समिती सदस्य आहेत. समितीचे कार्याध्यक्ष म्हणून इंद्रजीत नेताजीराव जेधे (श्रीमंत सरदार कान्होजी राजे जेथे-देशमुख यांचे वारसदार), तर सदस्य म्हणून दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक, पुराभिलेख संचालनालयाचे संचालक, अनिकेत हरिश्चंद्र बांदल (श्रीमंत सरदार रायाजी बांदल देशमुख यांचे बारसदार), श्रीनिवास अरुण इंदलकर (सरदार हिरोजी इंदलकर यांचे बारसदार), ऋषिकेश राजेंद्रसिंह नाईक-निंबाळकर (सरलष्कर सिदोजी नाईक- निंबाळकर यांचे वारसदार), नीलकंठ रामचंद्र बावडेकर (पंत अमात्य बावडेकर यांचे वारसदार), रवींद्र श्रीपतराव कंक (सरदार येसाजी कंक यांचे वारसदार), अभयराज शरद शिरोळे (सरदार शिरोळे यांचे बारसदार), कार्यावाह बाळासाहेब उर्फ रामदास हनुमंत सणस (सरदार पिलाजी सणस यांचे वारसदार), गोरख रोहिदास करंजावणे (सरदार जयताजी करंजावणे यांचे वारसदार), सचिन बाबुराव भोसले (बकाजी व कोंडाजी फर्जंद यांचे वारसदार), समन्वयक समीर बारेकर (सचिव-श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड), समन्वयक पांडुरंग रमेश ताठेले (कार्याध्यक्ष श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सथ सेवा समिती, दुर्गराज रायगड) यांचा या समितीमध्ये समावेश आहे.
दस्तऐवजांचे होणार डिजिटायझेशन
सरदार घरण्यासंबंधी ऐतिहासिक वास्तूंची यादी, ऐतिहासिक व मौल्यवान पुरावस्तू आणि पुरावशेष यांची यादी व त्याचे दस्तावेजिकरण तयार करण्याबरोबरच समकालीन दस्तावेजांचे व कागदपत्रांचे डिजिटायझेशन व जतन करून त्याचे संवर्धन ही समिती करणार आहे. त्यासाठी संबंधित भागातील नामवंत विद्यापीठातील आध्यासान केंद्रे, इतिहास व पुरातत्व विभाग यांची मदत घेणार आहे.