सांगोला प्रतिनिधी
ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता इतरांना आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांचा विरोध नाही. ओबीसी जनगणना, ओबीसी आरक्षण बचाव या संदर्भात येत्या ६ जानेवारी २०२३ रोजी पंढरपूर येथे दुपारी ३. वा. ओबीसी समाजाचा भव्य एल्गार मेळावा हा पंढरपुरातील मध्यवर्ती टिळक स्मारक येथे ठेवण्यात आला असुन या मेळाव्यात सकल ओबीसी समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सकल ओबीसी समाज सांगोला यांच्यावतीने करण्यात आले आहे.
या मेळाव्यासाठी ना. छगनराव भुजबळ यांच्यासह आ. गोपीचंद पडळकर, जयदत्त क्षीरसागर, प्रकाश शिंदे, आ. महादेव जानकर, मुस्लिम समाजाचे नेते शब्बीर अन्सारी यांच्यासह ओबीसी समाजातील सर्व जातीचे धर्माचे, राज्याचे राज्याध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
तरी या मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येने सकल ओबीसी समाज बांधवाने उपस्थित राहून या ऐतिहासिक ओबीसी बचाव, ओबीसी जनगणना झाली पाहिजे या एल्गार सभेचे साक्षीदार होण्याचे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.
या मेळाव्यात ओबीसी आरक्षण बचाव व ओबीसी जनगणना हि प्रमुख मागणी या मेळाव्यातून केली जाणार असून हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरातून ओबीसी समाजाचे नेते, ओबीसी समाज प्रयत्न करत आहेत.
या ओबीसी मेळाव्याची तयारी म्हणून गावोगावी बैठका चालू असून जास्तीत जास्त समाज या मेळाव्यासाठी कसा उपस्थित राहील यासाठी स्थानिक ओबीसी नेत्यांनी कंबर कसली आहे.