सोलापूर प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथे गेल्या महिन्यातील २७ तारखेला शावरसिद्ध बोळुरे यांच्या घरी अनपेक्षितपणे गॅस स्पोट होऊन त्यात चार जण अतिशय गंभीर जखमी झाले होते.या परिवारावर अचानक आलेल्या संकटातून सावरण्यासाठी हत्तूर येथील 'जनसेवा हिच ईश्वर सेवा सोशल फाउंडेशन' चा आधार मिळाला.
जनसेवा हिच ईश्वर सेवा सोशल फाउंडेशन या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ताबडतोब मदतीसाठी व्हाट्सअपच्या माध्यमातून मदतीसाठी आवाहन केले.अडोतीस हजार रुपये जमा झाले.जमा झालेल्या रक्कमेतून बोळुरे कुटुंबास स्वयंपाक घरात लागणारी आठ हजार रुपयांचे भांडी साहित्यासह या परिवाराला एक महीनाभर पुरेल इतके अन्नधान्य खरेदी करुन दिले.या कुटुंबासाठी गहू, तांदुळ, साखर, तेल,चहापत्ती, मिठ, तिखट, जिरे, मोहरे, कडधान्य, पोहे, रवा,घरगुती भांडी साहित्य व उर्वरित पंचवीस हजार रुपये देऊन आधार दिला. मुख्याध्यापक निंगराज शिवयोगी, सोसायटीचे उपाध्यक्ष भीमाशंकर कनपवडियार, ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव बन्नॆ, विश्वनाथ पाटील, मंदिराचे ट्रस्टी सोमनिंग कनपवडियार, जनसेवा संघटनेचे पदाधिकारी अमोघ पुजारी, राघवेंद्र पाटील, संजय ममदापुरे, श्रीकांत भरले, प्रदीप पाटील, सुभाष डोगे, महेश आवताडे, भीमाशंकर सतुबर, मलकारी कनपवडियार, बाबुशा कुंभार, विकास वाले, सोमनाथ वाघमोडे, गुरुनाथ सतूबर,सोमनाथ व्हनमाने,समर्थ अवताडे, श्रीशैल निंबर्गी, देवेंद्र कुंभार,नागनाथ पाटील, अंबादास कुंभार,अशोक कनपवडियार,बाशा पटेल, कांतप्पा पावटे, स्वराज रोणे, सिद्धाराम पाटील, अमोगी हिरकुर यांच्यासह जनसेवेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
*जनसेवेचा संकल्प*
बोळुरे कुटुंबावर अचानकपणे आलेल्या संकटातून बाहेर काढण्यासाठी जनसेवा हीच ईश्वर सेवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ताबडतोब मदतीसाठी चर्चा झाली.मदतीसाठी संकल्पना मांडली.पुढे मदतीचे हात पुढे आले.जमलेलेल्या रकमेतून आधार दिला.मनस्वी आनंद झाल्याचे अध्यक्ष राघवेंद्र पाटील यांनी सांगितले.
*जनसेवेचा आभार*
आमच्या कुटुंबावर अचानकपणे संकट कोसळेल.जनसेवा हिच ईश्वर सेवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मदतीसाठी पुढे आले.संकटकाळी केलेली मदत जीवनात कधीच विसरणार नाही. आज त्यांनी मदत करुन आधार दिल्याबद्द्ल शावरसिद्ध बोळुरे यांनी आभार मानले.