श्रीमती महाडिक, काळे, काळुंगे, अक्कलकोटे, शेख, चव्हाण, मोकाशी यांना जाहीर
पंढरपूर प्रतिनिधी
देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब व साहेबांना घडवणाऱ्या त्यांच्या मातोश्री श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने सालाबाद प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस व अजितदादा फाउंडेशन यांच्या वतीने आदर्श मातांना शारदाई पुरस्कार देवून त्यांना गौरविण्यात येणार आहे.
दगडालाही देव पण येण्यासाठी आधी हातोड्याचे घाव सोसावे लागतात त्यानंतरच त्या दगडाला देवत्व प्राप्त होतं त्याच पद्धतीने समाजामध्ये अनेक संकटांना अनेक वादळांना, अडचणींना तोंड देत संसाराचा गाडा पुढे घेऊन जात असताना समाजामध्ये आपली मुले चांगल्या पद्धतीने घडली पाहिजेत, त्यांच्या हातून देशसेवा व सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका व मिळालेली जबाबदारी त्यांनी आदर्शपणाने पार पाडली पाहिजे अशा हेतूने आपल्या आदर्शवत संस्काराने समाजात अशा अनेक आई आहेत की ते आपल्या मुलांना घडवण्यासाठी आपल्या सुखाची तिलांजली देऊन समाजामध्ये आपल्या मुलाला कर्तृत्वाने पुढे आणण्याचे काम करत असतात. अशा आदर्श मातांना शारदाई पुरस्कार देवून सन्मानित सन्मानित करण्यात येत असते.
त्यासाठी यावर्षीचे पुरस्कार घोषित झालेल्या आदर्श माता श्रीमती मंगलताई भीमराव महाडिक (खा.धनंजय महाडिक मातोश्री), श्रीमती मालनबाई वसंतराव काळे (चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मातोश्री), सौ शोभाताई शिवाजीराव काळुंगे (मुख्य कार्यकारी अधिकारी राजलक्ष्मी गायकवाड यांच्या मातोश्री), श्रीमती सुशीलाताई हरिभाऊ अक्कलकोटे (बार्शीचे नगरसेवक नागेगश अक्कलकोटे यांच्या मातोश्री), मुमताज रशीद शेख (महाराष्ट्र केसरी पै.सिकंदर शेख यांच्या मातोश्री), सौ ललिता लक्ष्मण चव्हाण (आय.ए.एस.राहुल चव्हाण यांच्या मातोश्री), श्रीमती सुलोचना मल्हारी मोकाशी (प्रसिध्द बाधंकाम व्यावसायिक चंद्रशेखर मोकाशी यांच्या मातोश्री)
यांना यावर्षीचे शारदाई पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे , माजी नगरसेवक मुहम्मद उस्ताद यांनी दिली असून पुरस्कार देण्यात येण्यात येणाऱ्या मातांच्या नावांची घोषणा देखील केलेली आहे. सदरच्या पुरस्कार वितरणांची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचे ही श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
सदर पुरस्कार कार्यक्रमासाठी अमोल परबतराव, तानाजी मोरे, शुभम पवार, दादा थिटे, संतोष बंडगर, माऊली कुंभार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.