सोलापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्षा आमदार कु. प्रणितीताई शिंदे यांच्या यांच्या निर्देशानुसार, सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी माजी नगरसेविका सौ. संजीवनी कुलकर्णी यांची निवड करण्यात आली असून त्यांचे निवडीचे पत्र केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे व अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पत्र देण्यात आले.
यावेळी माजी आमदार प्रकाश यलगुलवार, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे तिरुपती परकीपंडला, सिद्धाराम चाकोते, लक्ष्मीकांत साका, केशव इंगळे, अरुणा बेंजरपे आदि उपस्थित होते.