मुंबई प्रतिनिधी उदय वाघवणकर
दिनांक -०७ डिसेंबर रोजी सायंकाळी ठीक ०५ वाजून ३० मिनिटांनी मेघवाडी पोलीस ठाणे हद्दीतील पंत फाउंडेशन हॉल या ठिकाणी मोहल्ला कमिटी, व्यापारी संघटना, ज्वेलर्स संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग आयोजित केली होती.सदर मीटिंगमध्ये एबल मेघवाडी विनायक मेर, प्र. व. पो नि. विजय साळुंखे, पि. आर.ओ मपोनि सिमा सकुंडे, पो.नि. गुन्हे प्रशांत भरते तसेच व्यापार विभागाचे संजय सावंत व ग्राहक संरक्षण कक्षाचे महेश पडवळ यांनी मार्गदर्शन केले.व जमलेल्या पदाधिकाऱ्यांना आस्थापनावरील नाम फलकाबद्दलचे सुप्रीम कोर्टाचे आदेश समजावून सांगण्यात आले.दुकानावरील बोर्ड स्वतःहून आपण मराठी भाषेतील लावून घ्यावेत, अशा सूचना दिल्या.तसेच सर्वांनी आपल्या आस्थापनेवर सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत, वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले.ग्राहकाशी सौजन्याने वागावे, कायदा व सुव्यवस्थेचा कोणता प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले.संशयित व्यक्ती निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले.
आपल्या परिसरात कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखवल्या जाणार नाहीत याची खबरदारी घ्या, सामाजिक सलोखा राखून आपला विभाग शांत ठेवा असे सांगण्यात आले.सदर मीटिंगसाठी व्यापारी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.तसेच मेघवाडी पोलीस ठाणेचे पो.नि. व मिल्स स्पेशल उपस्थित होते.