पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
पंढरपूर हा सोलापूर जिल्ह्यातील महत्वाचा मोठा तालुका आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंढरी नगरीत मा.राष्ट्रपती महादेय, राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री महोदय असे अनेक व्हिव्हिआयपी मंडळी तसेच उच्चस्तरीय न्यायाधिश, अधिकारी वर्ग नेहमीच येत असतात. यामुळे येथे दोन अथवा तीन मजली विश्रामगृह असावे अशी मागणी माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी केली होती. यासह पंढरपूरातील शासकीय कार्यालये सर्वदूर पसरलेली आहेत. त्यातील 9-10 शासकीय कार्यालयांना स्व:ताची इमारतही नाही. भाडेतत्वावर घेतलेल्या इमारतीमध्ये अपुऱ्या सोयीमुळे नागरिकांची गैरसोय होते. पंढरपूर शहरातील ही सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी असावीत अशी गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर तालुक्यातील नागरिकांची मागणी होती. व मध्यवर्ती प्रशासकीय भवन होणे ही शासनासाठीही आवश्यीक बाब आहे.
तसेच त्यासाठी लागणारी जागा तहसील कार्यालय व सार्वजनिक बांधकाम उपविभागाची मिळुन सुमारे 5 ते 6 एकर जागा मध्यवर्ती ठिकाणी उपलब्ध आहे. यामध्ये ही इमारत होऊ शकते. त्याअनुषंगाने त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्रजी फडणवीस, तत्कालीन सार्वजनिक बांधकांम व महसूलमंत्री तथा उच्च व शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य चंद्रकांत दादा पाटील, तत्कालीन वित्त आणि नियोजन, वनेमंत्री तथा वनेमंत्री महाराष्ट्र राज्य सुधीरभाऊ मुनगट्टीवार यांच्याकडे गेली अनेक वर्षापासून सातत्याने माजी आमदार प्रशांतराव परिचारक पाठपुरवठा करत होते. परिचारक यांच्या पाठपुराव्यामुळे त्याअनुषंगाने सन 2017-2018 मध्ये हा प्रस्ताव मा.सचिव यांच्याकडे प्राथमिक आराखडा तयार करून दाखल करण्यात आलेला होता.
परंतू कोव्हीड-19 काळात तसेच सत्ता बदलल्यानंतर यासाठी मागील महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध करून दिला नसल्यामुळे पंढरपूरातील सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी असावी हे काम पुर्णपणे रखडलेले होते.
सत्ता बदलल्यानंतर पुन्हा माजी आमदार परिचारक यांनी या प्रस्तावा बाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, यांच्याकडे सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी व्हावी यासाठी सतत पाठपुरवठा करत होते. याला यश आले असून लवकरच सदर काम सुरू होणार आहे.
यामुळे पंढरपूरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे व पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांच्या वतीने मा.आ.प्रशांत परिचारक यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार व्यक्त केले.