सांगोला विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांसह सार्वजनिक बांधकाम उपविभाग प्रशासकीय इमारत तसेच पुलाच्या कामांना व सांगोला ग्रामीण रुग्णालय येथील ट्रामा सेंटर येथे माड्युलर ऑपरेशन थिएटर या कामांसाठी चालू हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या मधून ५० कोटी रुपयाचा निधी मंजूर
सांगोला प्रतिनिधी.
सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी चालू हिवाळी अधिवेशनात सांगोला तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांसह सांगोला सार्वजनिक बांधकाम उप विभागीय प्रशासकीय इमारत बांधकामसह सांगोला ग्रामीण रुग्णालय येथील ट्रामा सेंटर येथे माड्यूलर ऑपरेशन थिएटरसाठी एकूण ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
आमदार शहाजीबापू पाटील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजय झाल्यापासून सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणून विकास कामांचा डोंगर उभा करत आहेत सांगोला तालुक्याची दुष्काळी तालुका ओळख ही आमदार शहाजी बापू पाटील यांनी विविध योजनांचे पाणी शेती साठी आणल्याने सांगोला तालुक्याची दुष्काळ ही ओळख पुसून काढली आहे त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून ती कि कामे अंतिम टप्प्यामध्ये चालू असल्याचे दिसून येते पाण्याच्या योजनांच्या बरोबर सांगोला तालुक्यातील मूलभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ही आतापर्यंत आमदार शहाजी बापू पाटील यांनी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्यात यशस्वी झाले आहेत त्यामुळे सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये विकासाची नांदी पाहायला मिळत आहे
चालू हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार शहाजी बापू पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे मागणी केल्याप्रमाणे मेडशिंगी कडलास रस्त्यावर अप्रूपा नदीवर पूल बांधणे याकामासाठी ४कोटी २५लाख रुपये मंजूर,सांगोला सार्वजनिक बांधकाम उपविभाग प्रशासकीय इमारत बांधणे१कोटी ७५लाख व सांगोला येथील ग्रामीण रुग्णालय येथे ट्रामा सेंटर मध्ये मॉडेलवर ऑपरेशन थिएटर साठी ३कोटी ३६लाख तसेच सांगोला विधानसभा मतदारसंघातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग इतर जिल्हा मार्ग ग्रामीण मार्ग या रस्त्यांच्या कामांसाठी ४० कोटी रुपये असे एकूण ५० कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.
यामधून सांगोला चिंचोली धायटी शिरभावी उंबरगाव रस्त्यावरील उर्वरित पुलाच्या कामासाठी ३०लाख, मल्हार पेठ ते पंढरपूर या रस्त्यावरील महूद गावातील गटारीसह vकाँक्रीट रस्ता करणे या कामासाठी २कोटी, लोटेवाडी गावातील फॉरेस्ट ते सोनलवाडी पर्यंत रस्ता करण्यासाठी २कोटी ७०लाख हातीद जवळा रस्त्यावरील मानेगाव पाण्याची टाकी जवळील रस्तासाठी व जवळा ते घेरडी रस्त्यावरील घेरडी गावाजवळील रस्ता करण्यासाठी ३कोटी ५०लाख, मेडसिंगी जवळा रस्त्यावरील उर्वरित पुलाच्या कामासाठी ५०लाख, बचेरी शिंगोर्णी कटफळ आचकदानी सोनलवाडी य मंगेवाडी वाटंबरे निजामपूर हंणमंतगाव सोनंद भोपसेवाडी घेरडी या रस्त्यावरील कटफळ अचकदाणी फॉरेस्टजवळ आणि सोनंद गावाजवळील रस्ता करणे २कोटी, चोपडी ते हतीद रस्त्यासाठी2कोटी ७०लाख, मांजरी देवकतवाडीधायटी रस्त्यासाठी २कोटी ७०लाख, महीम ते जैनवाडी या रस्त्यासाठी १कोटी ८०लाख, चिकमहूद ते महानवर वस्ती दोन पुलासह रस्ता करण्यासाठी २कोटी ५०लाख, सोनंद ते डोंगरगाव रस्त्यासाठी १कोटी ५०लाख, राजगेवाडी डोंगरगाव रस्त्यासाठी ३५लाख, जैनवाडी ते पवार देसाई वस्ती या रस्त्यासाठी ५०लाख, जुना अकलूज रस्ता ते बाजीराव विहीर पर्यंत रस्ता करणे या कामासाठी १कोटी ५०लाख, भाळवणी ते चौगुले वस्ती रस्ता करण्यासाठी १कोटी, धोंडेवाडी ते सुपली रस्ता करण्यासाठी १ कोटी ५०लाख, शेंडगेवाडी सातपुते वाडी केसकरवाडी हा रस्ता करण्यासाठी १कोटी ५०लाख वाकी घेरडी वाणीचिंचाळे ते भोसे हा रस्ता करण्यासाठी ३कोटी ५०लाख, जवळा ते अंबिका वस्ती हा रस्ता करण्यासाठी ४०लाख, प्रतिमा 69 ते जवळा धुमाळवाडी रस्ता करण्यासाठी ७५लक्ष, जवळा ते प्रजिमा ६९ पर्यंत रस्ता करण्यासाठी १कोटी, एखतपूर ते अजनाळे जुना रस्ता करण्यासाठी ७०लाख अकोला ते नकातेवाडी ते निजामपूर या रस्त्यासाठी ७५लाख, जवळा ते सोनंद या रस्त्यासाठी ७५लाख, हातीद ते कदम वस्ती घाडगे मळा कारंडेवाडी ते गौडवाडी ७५लाख, डिकसळ ते अंतराळ जिल्हाहद्दीपर्यत रस्ता करणे ७५ लाख, आगलावेवाडी ते लोहगाव रस्ता करणे५०लाख या रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला.
सर्व कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरच कामे सुरु करून व दर्जेदार करण्याच्या सूचना आमदार शहाजी बापू पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.