अक्कलकोट प्रतिनिधी
शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेते पदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा सुरू केला आहे. दौऱ्याची सुरुवात अक्कलकोट नगरी पासून करण्यात आली असून त्यांनी गुरूवार दि.३०/११/२३ रोजी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ देवस्थान चे दर्शन घेऊन पदाधिकारी सुसंवाद दौऱ्याला सुरुवात केली.
महाराष्ट्रात सध्या बिघाडी सरकार असून ते लवकरच पायउतार होईल, जनहिताचे कसलेही सोयर सुतक नसणारे नेते सत्ता स्थानी आहेत जनता त्याना कंटाळली आहे, राज्यात पुन्हा उद्धवजी ठाकरे साहेबां सारखे सुसंस्कृत नेतृत्व आणण्यासाठी आपण सगळे शिवसैनिक जिवाचे रान करू या. सोलापूर जिल्ह्यातून आपण मोठे योगदान पक्षाला देऊ या.यासाठी एक जुटने कामाला लागू.महाराष्ट्रावर भगवा फडकाविण्यासाठी उद्धवजी ठाकरे यांना ताकद देऊ असे प्रतिपादन गायकवाड यांनी केले. या प्रसंगी गायकवाड यांनी पक्ष बांधणी व तालुक्यातील महत्त्वाच्या प्रश्नावर पदाधिकाऱ्या समवेत चर्चा केली.तसेच सुनील कटारे यांच्या निवासस्थानी देखील गायकवाड यांनी भेट दिली. सदरची बैठक ही मल्लिनाथ खुबा यांच्या स्वामी समर्थ यात्री निवास या ठिकाणी घेण्यात आली. या प्रसंगी जिल्हाप्रमुख अमर पाटील, उपाध्यक्ष सुनील कटारे, तालुकाप्रमुख आनंद बुक्कानवरे ,अल्पसंख्याक तालुकाप्रमुख आयाज भाई जमादार, शिवसेना प्रसिद्धीप्रमुख मल्लिनाथ खुबा, शिवसेना अल्पसंख्यांक शहर प्रमुख महमूद पठाण ,शिवसेना पक्षाचे युवा निष्ठावंत शिवसैनिक शरण सुरवसे ,मैंदर्गी शहर प्रमुख मल्लूअरवत, शिवसेना युवती सेना अधिकारी पूजा खंदारे शशिकला चिवडशेट्टी, मंगल थोरात ,आदींची उपस्थिती होती .
यावेळी अक्कलकोट तालुक्यातील पदाधिकारी यांनी सौ.अस्मिता गायकवाड यांचे जोरदार स्वागत केले.
लोकसभा विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपल्या आहेत त्याच अनुषंगाने शिवसेना पक्ष बांधणीसाठी लोकप्रतिनिधी आपल्या मतदार संघामध्ये आपली पकड घट्ट करताना दिसून येत आहेत त्याचप्रमाणे शिवसेना पक्षाच्या उपनेत्या अस्मिता ताई गायकवाड यांच्या दौऱ्याला सुद्धा प्रारंभ झाला असून लोकसभा आणि विधानसभेची जय्यत तयारी त्याचप्रमाणे पक्ष संघटन बळकट करण्यासाठी कंबर कसलेली आहे. हा दौरा 30 नोव्हेंबर ते सहा डिसेंबर पर्यंत असणार आहे.