मुंबई बांद्रा -प्रतिनिधी महेश्वर तेटांबे
एम एफ ए मुंबई फुटबॉल असोसिएशन यांच्या सौजन्याने वाय पी एल फुटबॉल स्पर्धा अंडर/१७ फुटबॉल आयोजित फुटबॉल टूर्नामेंट नेवील डिसूजा ग्राउंड बांद्रा, मुंबई इथे संपन्न झालेल्या स्पर्धेत विगौर् एफ सी फुटबॉल संघ आणि मुंबई टायगर जे जे हॉस्पिटल संघ यांच्यामधील फुटबॉल सामन्यात मुंबई टायगर जे जे हॉस्पिटल संघाने विगौर् एफ सी संघावर
९--0 ने मात करून विजय प्राप्त केला. या सामन्यात जे जे मुंबई टाइगर संघाच्या नयन सोलंकी याने ३ गोल करून हॅटट्रिक केली. या स्पर्धेत अनुक्रमे कौशिक वाघेला १ गोल, पियूश सोलंकी २ गोल, अरमान सोलंकी १ गोल, तनिष सुपत १ गोल, प्रिन्स सोलंकी १ गोल करून जे जे बॉम्बे टायगर विजयी झाले. या स्पर्धेत नयन सोलंकी आणि तनिष सुपत यांनी आकर्षक खेळी खेळून मुंबई टायगर जे जे एफ सी
संघाला विजय प्राप्त करून दिला. प्रशिक्षक तुषार चव्हाण, छगन चव्हाण सर आणि जेशल चौहान यांनी संघावर खूप मेहनत घेवुन संघाला वर्चस्व प्राप्त करून दिले.