माळशिरस तालुका प्रतिनिधी जयराम घाडगे
शिक्षण प्रसारक मंडळ, अकलुजचे मार्गदर्शक संचालक तसेच सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना लि. शंकरनगरचे चेअरमन मा. श्री जयसिंह शंकरराव मोहिते पाटील उर्फ बाळदादा यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त वेळापूर येथे अर्धनारी नटेश्वर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नुतन इमारतीच्या प्रांगणात महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, महादेव देवालय देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्त, वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटी वेळापूर चे चेअरमन व सर्व संचालक तसेच वेळापूर परिसरातील सर्व पत्रकार बंधू यांच्या हस्ते 75 व्या वाढदिवसानिमित्त 75 झाडे लावण्यात आली.
बाळदादांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. श्री अमरसिंह माने देशमुख यांच्या वतीने सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील विद्यालयात प्राथमिक, माध्यमिक व ज्युनिअर विभाग व महाविद्यालयातील मिळून एकूण 1200 विद्यार्थ्यांना बिस्किट, गोळ्या व चॉकलेट इत्यादी खाऊ वाटप करण्यात आला व बाळदादांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. श्री. अमरसिंह माने-देशमुख, श्री महादेव देवालय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मा. श्री.अमृतराज माने देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री.दत्तात्रय माने, श्री.वीरकुमार दोशी, श्री.शंकरराव माने-देशमुख, श्री. विठ्ठल सावंत, श्री अशोक साबळे, श्री.चंद्रकांत आडत तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूजचे संचालक मा.श्री बाळासाहेब माने- देशमुख, वेळापूर सोसायटीचे संचालक श्रीधर देशपांडे व वेळापूर परिसरातील पत्रकार बांधव उपस्थित होते तसेच महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी ही उपस्थित होते.