मोफत सर्वरोग निदान शिबीर संपन्न
पंढरपूर प्रतिनिधी अमोल कुलकर्णी
सर्वाधिक मानसिक तणाव हा समाजात शिक्षकांवर असतो कळत नकळत त्याचा भार त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांवर पडत असतो शिक्षक तंदुरुस्त तर समाज भक्कम घडत असतो.आरोग्य संपन्न जीवन व खुखी कुटुंब,समाज संकल्पनेतून सर्वांसाठी सर्वरोग निदान आरोग्य शिबीर घेतल्याची माहिती पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या माध्यमातून महात्मा फुले जयंती निमित्त शिक्षक, कर्मचारी कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी मध्ये ह्रदय चिकित्सा, नेत्र तपासणी, मधुमेह तपासणी,दात आणि इतर विकार निदान आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या.
यावेळी कृती समितीचे सर्व सदस्य,शिक्षक कर्मचारी,पतसंस्था कर्मचारी तसेच तालुक्यातील 111 शिक्षक व कुटुंबांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या.यासाठी डॉक्टर विराग दोशी, नेत्ररोग तज्ञ किरण बहिरवडे त्वचारोग प्रकाश लवटे,दंत तज्ञ विजय वाघ व त्यांचे सर्व सहकारी कर्मचारी यांचे योगदान लाभले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्कार पतसंस्था,कृती समिती कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.