सोलापूर प्रतिनिधी
केगांव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिनानिमित्त एनएनएस व सिव्हिल इंजिनिअरिंग स्टूडेंट असोसिएशन यांच्या मार्फत एक सामाजिक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.शंकर नवले, उपप्राचार्य डॉ.शेखर जगदे व डॉ.रवींद्र व्यवहारे, सिव्हिल इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. प्रदिप तपकिरे यांनी केले. लुपिन डायग्नोटिक्स या नामांकित आरोग्य तपासणीव्दारे अगदी कमी दरात रक्त तपासणी करण्यात आली, यात प्रामुख्याने सीबीसी, टीएसएच, शुगर, कॉलेस्ट्रॉल व इतर तपासण्या करण्यात आल्या.
या शिबिरात एकूण १६२ जणांनी तपासणी केल्या असून यामध्ये सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थी प्रतिनिधी सागर करमल, अभिषेक लोमटे, आदित्य गोफणे, सरस्वती साळुंखे, आदित्य गायकवाड, करण सावंत यांनी हे शिबिर पार पाडले. या शिबिरासाठी सेसा प्रमुख प्रा.सतिश आवारे व एनएसएस प्रमुख प्रा. शशीकांत लमकाने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.