कडेगाव प्रतिनिधी
श्री संत शिरोमणी नामदेव शिंपी समाज कडेगांव येथे श्री.संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५३ जयंती निमित्त.. दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ गुरुवार पहाटे ५/०० वाजता अभिषेक पुजा अर्चना सकाळी ९ ते १२/०० वाजता पर्यंत भजन, जन्मोत्सव व आरती, प्रसाद वाटप करण्यात आले.अष्ट्रदेवी भजन मंडळ यांच्या भजनाच्या कार्यक्रम झाले.
यावेळी समाज अध्यक्ष श्री.जयंत वेल्हाळ, उपाध्यक्ष मानव परदेशी, खजिनदार संजय महाडीक,अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली राज्य महाराष्ट्रचे प्रदेश प्रसिद्ध संतोष मुळे,माजी अध्यक्ष सुनिल भस्मे,माजी उपाध्यक्ष महेश पंतगे,श्रीधर बकरे, संजय लाटोरे,महेश भस्मे , सर्व समाज बांधव उपस्थित होते.