परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या कुटुंबांचा जागर स्वच्छता टीम व लेकीचं झाड टीम वतीने पुरस्कार देऊन होणार सन्मान
करकंब प्रतिनिधी
करकंब येथे गेल्या दोन वर्षांपासून करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमच्या माध्यमातून वृक्षारोपण करुन त्याची जोपासना करण्याचे काम गावच्या लेकींच्या सहकार्याने होत असताना आतापर्यंत ६५० भारतीय झाडांची लागवड करण्यात आली असून झाडांची वाढही चांगली होत आहे.तसेच जागर स्वच्छता अभियान टीमच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी सकाळी दोन तास एका भागाची स्वच्छता करण्यासाठी सर्व स्वच्छतादुत एकत्र येऊन स्वच्छता करतात.जेणेकरुन पर्यावरणाचे रक्षण व्हावं आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर दिसावयासाठी कर्तव्य भावनेने खारीचा वाटा उचलत आहेत.सदर कार्यात सातत्य राखण्याचा प्रयत्न केला जात आहे.यासाठी गेली दोन वर्षे काम करीत असताना आज दुसरा वर्धापन दिन साजरा करीत असताना करकंब मधील आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या कुटुंबांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करुन गौरविण्यात येणार आहे .
संत तुकाराम महाराज यांचे वंशज वृक्षप्रेमी शिवाजी महाराज मोरे आणि लेकीच्या झाडाचे मुळ संकल्पक सुरेशजी पवार यांचे अनमोल मार्गदर्शन मिळणार असून हा कार्यक्रम रविवार दिनांक २६नोव्हेंबर सायंकाळी ५:३०वा.श्री चौंडेश्वरी मंदिर सोमवार पेठ येथे आयोजित करण्यात आला असून सर्व करकंबकर व करकंब पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे.यासाठी करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम व जागर स्वच्छता अभियान टीम अधिक परिश्रम घेत आहेत.