फोटो सौजन्य रुपेश सदावर्ते साई डिजिटल करकंब
पर्यावरणाचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे:- शिवाजी महाराज मोरे
झाडे लावणे आणि आपला परिसर स्वच्छ ठेवणे काळाची गरज:-सुरेश पवार
करकंब प्रतिनिधी
करकंब येथे करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम व जागर स्वच्छता अभियान टीमचा दुसरा वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता त्यावेळी तुकाराम महाराज यांचे वंशज वृक्षप्रेमी आदरणीय शिवाजी महाराज मोरे आणि व्याख्याते सुरेश पवार बोलताना सांगितले.
सुरुवातीला शिवाजी महाराज मोरे,सुरेश पवार,शैलेश गायकवाड ज्ञानेश्वर दुधाणे, हरिश्चंद्र वास्ते,प्रमोद रेडे,रमेश खारे,संतोष भोसले नंदलाल कपडेकर,अंजली टकले, औदुंबर कुंभार,सविता दुधाणे,प्रमोद रेडे,राजू अनवते,नागेश खारे,चेतन पुरवत,यांच्या शुभहस्ते चौंडेश्वरी मातेची पूजा व दीपप्रज्ववन करुन झाली.
यावेळी वृषाली बोधे यांनी जागर टीम व लेकीचं झाड टीम कशा पध्दतीने काम करतोय याची माहिती सांगितली.त्यानंतर लेकीच झाडाचे मुळ संकल्पक सुरेशजी पवार यांनी बोलताना लेकींच झाडांची कल्पना कशी सुचली आणि ही काम करीत असताना किती अडचणींना तोंड द्यावं लागतं,आणि अशा उपक्रमांना साथ कमी मिळते पण आत्मिक आनंद जास्त मिळतो.त्यामुळे कामात सातत्य ठेवा यश निश्चित मिळेल.यानंतर तुकाराम महाराज यांचे वंशज वृक्षप्रेमी आदरणीय शिवाजी महाराज मोरे यांनी हरीत वारी करण्यासाठी अधिक परिश्रम कशा प्रकारे घेत आहोत आणि भंडारा डोंगर,भामचंद्र डोंगर हरीत करण्यासाठीचा. प्रयत्न वृक्षदायी संस्थेच्या माध्यमातून कशाप्रकारे करतो.आणि वृक्षलागवड करणे पुण्याचं तर काम आहेच आहे.
पुढील तरुण पिढी वाचवायची असेल तर वृक्षारोपण ही काळाची गरज आहे सांगितले सर्वांनी आपली एकी अखंड ठेवा. यानंतर करकंब मधील आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या कुटुंबांचा स्वच्छ कुटुंब सुंदर कुटुंब पुरस्कार प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आला. त्यामध्ये करकंब पोलीस स्टेशन,सुदर्शन दुधाणे,वैभव पंत,याकुब तांबोळी,मनोज पुरवत,हरि ढोबळे,अशोक म्हेत्रे,राजेश खंदारे, अंकुश जाधव, नवनाथ कुंभार,भागवत भंडारे, मुमताज शेख, श्रीकांत आरोळे, गणपत शिंदे, ज्ञानेश्वर राजगुरू,यांना सन्मानपत्र व मानाचा फेटा बांधून पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर अमृता सरगुले हिचा राज्यस्तरीय योग स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल व करकंब क्रिकेट क्लब आयोजित महाराष्ट्र भर गावच नाव रोशन केल्यामुळे प्रतिनिधी संजय मोहिते यांचाही सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदलाल कपडेकर यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लेकीच झाड संकल्पक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले.पाहुण्यांची ओळख संंतोष भोसले अंजली टकले यांनी केली.तर आभार प्रा.प्रमोद रेडे पाटील यांनी मानले.
यावेळी करकंब ग्रामस्थांनी उपस्थित राहून निश्चितच भविष्यकाळात आम्हींही सहभागी होऊन पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सहकार्य करु असे सांगून सुंदर कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जागर स्वच्छता अभियान टीम, करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम व एकलव्य अभ्यासिका सर्व कार्यकर्त्यांनी अधिक परिश्रम घेतले.