सुस्ते प्रतिनिधी
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचलित श्री दत्त विद्या व कनिष्ठ महाविद्यालय सुस्ते प्रशालेत आज 26 नोव्हेंबर संविधान दिन साजरा करण्यात आला.
प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान ग्रंथाचे पूजन प्रशालेचे प्राचार्य प्रा.सुधाकर पिसे यांचे हस्ते करण्यात आले. संविधान दिना बद्दल प्रशालेतील काही विद्यार्थ्यांची निवडक भाषणे झाली.सहशिक्षक गणेश खिलारे यांनी भारतीय राज्यघटना अर्थात संविधानाबद्दल माहिती दिली.संविधानातील तरतूदी, नागरिकांची कर्तव्ये याबद्दल माहिती देऊन प्रशालेचे प्राचार्य प्रा.पिसे यांनी विद्यार्थ्यांना बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी असणारे योगदान तसेच संविधानाची निर्मिती व त्यामुळे मिळणारे हक्क- अधिकार अधोरेखित केले.
यावेळी पर्यवेक्षक रणजीत शिनगारे,विलास दराडे,ज्येष्ठ लिपीक राजकुमार ढगे व सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जैनुद्दीन शेख यांनी केले. सामूहिक संविधान उद्देशिकेचे वाचन व प्रतिज्ञा म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. मदन क्षीरसागर, सचिव ॲड.वैभव टोमके, उपाध्यक्ष प्रा.शिवाजी वाघ, सहसचिव अजित नडगिरे, खजिनदार सलीम वडगावकर, जेष्ठ संचालक आप्पासाहेब चोपडे, दिलीप घाडगे, अनिरुद्ध सालविठ्ठल, मुकुंद देवधर, विजयकुमार माळवदकर,सौ.सुनिता मोरे आदींनी कौतुक केले.