पंढरपूर प्रतिनिधि
'इचलकरंजी यार्न एक्स्पो-२०२३' या सूत व्यावसायिक गूड्स प्रोसेस प्रदर्शनास पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा आवताडे उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मा.श्री.समाधानदादा आवताडे यांनी सदिच्छा भेट देऊन प्रदर्शना साठी उभारण्यात आलेल्या विविध स्टॉल विषयक माहिती जाणून घेतली.
संपूर्ण देशभरातील अनेक नामांकित सूत उत्पादक कंपन्यानी यामध्ये सहभाग घेतला होता. सोलापूर जिल्ह्यातील सूत उत्पादन व्यवसाय क्षेत्रामध्ये गुणात्मक आणि दर्जात्मक सूत निर्माण करणारे व्यावसायिक हब म्हणून आवताडे स्पिनर्स प्रा.लि. यांची उल्लेखनीय ओळख आहे. सदर प्रदर्शनामध्ये आवताडे स्पिनर्स प्रा.लि. मधील उत्पादन प्रक्रियेची सखोल माहिती आणि पद्धत येणाऱ्या व्यावसायिक आणि नागरिकांना यावेळी देण्यात आली.
यावेळी श्री.कुर्मदास जी चटके , जिल्हा लेबर फेडरेशन संचालक श्री.सरोजभाई काझी, प्लान्ट इन्चार्ज श्री.सुनिल जी कमते , चिफ अकाउटंट श्री. भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.