सोलापूर प्रतिनिधी
विनायक नगर येथील राजराजेश्वरी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवकालीन शस्त्रे व वस्तूंचा संग्रह प्रदर्शन,भुईकोट किल्ला,ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर आदी ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली.
शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रभेट या शैक्षणिक उपक्रमांतर्ग राजराजेश्वरी प्राथमिक शाळेतील चौथी ते सातवीतील ३०० विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांना भेट देऊन माहिती मिळविली.
प्रथम गोविंदश्री मंगलकार्यात भरविण्यात आलेल्या शिवकालीन शस्त्रे व वस्तूंचा संग्रह प्रदर्शन पाहिले.संयोजक माधवराव देशमुख यांनी सर्व शिवकालीन शस्त्रे व वस्तूंचा माहिती सांगितले. विद्यार्थ्यांनी तलवार ढाल, वाघनखे,भाले, कुराडे,चाकू, कंदिल, गोळा, बिछवा, कट्यार,नेपाळी कुकरी, अडकित्ता, विजय नगरी कट्यार आदी विविध ५०० शिवकालीन शस्त्रास्त्रे पाहिले व हाताळले. त्यानंतर भुईकोट किल्ला या ठिकाणी भेट देऊन भुईकोट किल्ल्यासंबधी माहिती मिळवली.याप्रसंगी सहशिक्षक हणमंत कुरे यांनी किल्ल्यातील विविध ऐतिहासिक तोफ, बुरुज, तटबंदी याविषयी माहिती सांगितले.शेवटी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराला भेट देऊन मंदिर व परिसरातील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती सांगितले. सिद्धेश्वर मंदिरामध्ये सर्व विद्यार्थ्यांना अन्नक्षेत्रात महाप्रसाद वाटप करण्यात आला.
श्री सिद्धेश्वर महाराजांची दर्शन घेऊन शाळेकडे सहल परतली. याप्रसंगी विशाल खाडे, बसवराज बिराजदार, मल्लिकार्जुन बिराजदार, श्रेयस बिराजदार, सुजाता फुलारी, वैशाली गुजर , शिरसाट,नागेश कलंत्री, आदी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.