"इनोव्हेटिव्ह टिचर्स अवार्डचे शानदार वितरण"
नाशिक प्रतिनिधी पूनम पाटगावे
नाशिक जिल्ह्यातील करंजाड येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कॉम्रेड उदाराम तुळशीराम देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती सोनवणे यांना शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी सन २०२३ २४ चा इनोव्हेटिव्ह टिचर्स अवार्डने सन्मानित करण्यात आले. हॉटेल पंचवड प्राईड, दिंडोरी रोड नाशिक येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. पुरस्कार वितरण सोहळ्यास आमदार राहुल उत्तमराव ढिकले, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर संजीव सोनवणे साहेब, पोलीस कमिशनर अंकुश शिंदे साहेब, अभिनेत्री स्मिता प्रभु, व्हीएन चतुर्वेदी (सी.ए.मुंबई), भूषण निकम, आबा अहिरे, कार्यक्रमाच्या व्यवस्थापिका सौ. रोहिणी पाटील (चेअरमन एजीसी एस इवेंट) उपस्थित होते.
प्राचार्या श्रीमती एम. बी. सोनवणे मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कॉम्रेड उदाराम तुळशीराम देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय करंजाड ता. बागलाण जिल्हा नाशिक येथे कार्यरत आहेत. विद्यालयात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतील विविध शाखांवर केलेल्या आदर्शवत कामांचा अनुभव व प्रशासनाची हातोटी यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांच्यात होणाऱ्या ज्ञानाच्या संक्रमणासाठी सदोदित मार्गदर्शन करीत असतात. विद्यालयात विविध सहशालेय उपक्रमांचे, स्पर्धा परीक्षांचे आयोजन करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विद्यालय परिवार शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थी विकासाचे व्रत घेतलेल्या प्राचार्या श्रीमती सोनवणे यांना सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.