सोलापूर प्रतिनिधी
केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा शिक्षक-पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला.यावेळी पालक सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सिंहगड संस्थेचे सहसचिव तथा सोलापूर सिंहगड कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय नवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संशोधक व डी वाय पाटील युनिव्हर्सिटी चे माजी कुलगुरू डॉ. एस. एच. पवार उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर ,प्राचार्य डॉ. शंकर नवले,उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे व डॉ. शेखर जगदे प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. विनोद खरात,पालक सभा समन्वयक प्रा. रवींद्र देशमुख उपस्थित होते.या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलनाने झाली त्यानंतर प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. विनोद खरात यांनी आपल्या प्रास्ताविकात प्रथम सत्राचे केलेले नियोजन, विविध अभ्यास व अभ्यासेतर उपक्रमांची माहिती दिली व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला व महाविद्यालयातील टिचिंग लर्निंग व शैक्षणिक उपक्रम व परीक्षेचे नियोजन याबाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी सिंहगड महाविद्यालयाची यशस्वी परंपरा ,महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विवीध प्रकल्प स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल माहिती दिली.ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. एच. पवार यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करून बिकट परिस्थिती वर मात करणे शक्य आहे, ज्ञान हेच पुढील काळात प्रथम प्राधान्य असणार आहे असे आवर्जून सांगितले.प्रथम वर्ष विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे अभ्यासाचे व वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे हे नमूद केले.सिंहगड संस्थेचे सहसचिव श्री.संजय नवले यांनी युनिट टेस्ट मध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.यावेळी सिंहगड महविद्यालयातील प्रथम सत्रातील विद्यापीठात अव्वल क्रमांक प्राप्त करणाऱ्या तेजा शेवाळे, विशाल मोटे, अंबादास गोटे, सृष्टी नवले या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी तृप्ती पाटील व साक्षी शिंदे यांनी केले प्रा. किरण पाटील यांनी उपस्थित पालकांचे व मान्यवरांचे आभार मानले.या पालक सभेसाठी सुमारे २२५पालक उपस्थित होते.