मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
लायन्स क्लब तर्फे ऑक्टोबर चा पहिला आठवडा हा सेवा आठवडा म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो.यावर्षी दिनांक २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत हा आठवडा साजरा करण्यात आला.यावेळी लायन्स क्लब ऑफ बॉम्बे विलिंग्डन क्रिसेंट च्या वतीने नानावटी रुग्णालय येथे कर्करोग व मुधमेह यावर जनजागृती चर्चा, मुलींसाठी सन्मान प्रकल्प, शाळांमध्ये आरोग्य व स्वच्छता विषयक जा जनजागृती, वसईतील शाळेत स्वच्छ पिण्याचे पाणी, वॉटर प्युरिफायर, कॉम्प्युटर लॅब अशा विविध सेवा प्रकल्पांचे आयोजन करण्यात आले होते.मुंबईत देखील विविध शाळांमध्ये वंचित कुटुंबीयासाठी अन्नदान, वैद्यकीय शिबीर, वॉटर प्युरिफायर, पोलीस ठण्यात वॉटर कुलर, भारतीय जवानांसाठी मिठाई, विकलांग मुलांसाठी व्हील चेअर वाटप करण्यात आले.
या सर्व प्रकल्पांना माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन एस नायर आणि लायन एस वुकड्डला, अध्यक्ष लायन सुमित अग्रवाल, OSW चे चेअर पर्सन लायन राजेश दुतिया, डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन लायन तस्निम हरियानवाला, लायन मेंबर असूंता डिसोझा, लायन रोमा सिन्हा, लायन एस डायस, लायन प्रभकार बोडस, लायन डॅनी, लायन बिंदू, लायन अविनाश, लायन राजेश कपूर, लायन सुमेधा, लायन व्यंकटेश भंडारे, आणि इतर अनेक सभासद या सेवा सप्ताहात सहभागी झाले होते.
सेवा सप्ताहाच्या अंतिम फेरीत लायन्स क्लब ऑफ बॉम्बे वेलिंग्डन क्रीसेंट ला एक्सलंस प्लॅटिनम ट्रॉफी मिळाली.