पंढरपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या पशु संवर्धन विभाग व जेष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे पंढरपूर येथे लंम्पी जनजागृती अभियान दि २९ सप्टेंबर २०२३ रोजी संपन्न झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि पशुवैद्यकीय प्रतिष्ठान पंढरपूर चे अध्यक्ष डॉ. विश्वासराव मोरे यांनी लंम्पी रोगाची प्रमुख कारणे, लक्षणे, व त्यावरील उपाय यावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच पंढरपूर पंचायत समितीचे पशुधन विस्तार अधिकारी डॉ. प्रियंका जाधव यांनी उपस्थितांना लंम्पी रोगाबद्द्ल घेवयाची काळजी व उपाय यावर मार्गदर्शन केले. यावेळी भंडीशेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ ए एन आसबे यांनी सदर कार्यक्रमाची प्रस्तावना केली. या अभियानासाठी पंढरपूर पंचायत समिति चे सहाय्यक पशुधन पर्यवेक्षक डॉ. संजय देशपांडे, पशुवैद्यकीय दवाखाना भंडीशेगाव चे डॉ. अनिल खाने, शेळवे येथील ग्रामपंचायत सदस्य श्री. शशिकांत नागटीळक उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करून स्वागत करण्यात आले.
सदर कार्यक्रमावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, विभागप्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. अनिल बाबर, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. दिपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उप प्राचार्य प्रा. जगदीश मुडेगावकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच प्रा. गणेश बागल यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.