सोलापूर प्रतिनिधि
सोलापूर येथील ताडीवाला रोड परिसरात अनेक आजी आजोबा एकटे राहतात. त्यापैकी कुणाला नातेवाईक नाही तर कुणाला नातेवाईक असून देखील त्यांना पाहत नाही, तर कुणाची आर्थिक परिस्थीती बेताची आहे.
पैशाअभावी हे आजी आजोबा बीपी , शुगर व इतर आजारावरील औषधे विकत घेऊ शकत नाही. अशाच आजी आजोबांना वैदकिय उपचारासाठी लागणारे औषधे आज आपल्या सावली सोशल फाउंडेशन संस्थेच्या मदतीने दीपगृह सोसायटी या संस्थेला देण्यात आली.
दीपगृह सोसायटी च्या सहाय्याने हे औषधे गरजू आजी आजोबांना देण्यात आली आहेत.अशी माहिती मोहिते यांनी दिली.