सोलापूर प्रतिनिधि
लायन्स क्लब सोलापूर सिटीचे अध्यक्ष, सोलापूर जिल्हा तायकॉन्दो असोसिएशन कॉन्सिलचे विध्यामान अध्यक्ष लायन मोहन भुमकर यांच्या शुभहस्ते श्री सिध्देश्वर बाल मंदिर शाळेची माजी विद्यार्थिनन सोलापूरची हिरकणी कन्या कराटे चॅम्पियन साक्षी सुरेश तोरणगी हिचा कॅनडा येथे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाल्यामुळे आपल्या हरी ओम विणकर बाग, प्रभात योगा क्लास वतीने सौ. रजनी अवसेकर मॅडम ह्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
सर्वानी यावेळी सौ साक्षी तोरणगी सौ शोभा तोरणगी, सौ जयश्री वाडीकर, श्री सत्यनारायण पसनूर, श्री नरसप्पा इंदापुरे, श्री शंकर कनकी, श्री नागेश्वर कन्ना, श्री सोमशेखर भोगडे यांची उपस्थिती होती. तिच्या या यशाबद्दल कौतुक करून शुभेच्छा देण्यात आल्या. साक्षीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
----------------------------------