भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे तेज न्यूज परिवाराच्या वतीने करकंब येथील शिक्षक ,एकलव्य अभ्यासिकेचे उपाध्यक्ष, करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमचे संकल्पक,जागर टीमचे स्वच्छतादुत व तेज न्यूज चे मार्गदर्शक ज्ञानेश्वर दुधाने यांचा सत्कार संपादक प्रशांत माळवदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी दुधाने म्हणाले की ग्रामीण भागातील आपले न्यूज चॅनल सर्व दुर पोहचले आहे. ग्रामीण भागासह, शहरी भागातील विशेषतः शैक्षणिक बातम्यास मोठी प्रसिद्धी दिली जात आहे. आणि सर्वात फास्ट वाचकांपर्यंत पोहचवली जात आहे. त्यामुळे वाचकांना तात्काळ बातमी समजली जात आहे. यापुढील कार्यास शुभेच्छा व तेज न्यूज परिवाराची प्रगती होत राहो हीच प्रार्थना.