खडकी प्रतिनिधी
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये संजय गांधी भाजी मंडई मध्ये शेडचे काम सुरू करण्यात आले आहे. भाजी मंडई मध्ये जेसीबीच्या साह्याने खड्डे करण्यात येत आहे, मात्र सुमारे २ महिन्यापूर्वीच मंडई मध्ये १२ लाख रुपये खर्च करून काँक्रिटीकरण करण्यात आले होते, प्रशासनाला जर मंडई मध्ये शेड उभारायचे होते तर काँक्रिटीकरणासाठी तब्बल १२ लाख रुपये खर्च का करण्यात आले असा प्रश्न खडकीकर उपस्थित करीत आहेत, दरम्यान काँक्रिटीकरणाचा खर्च वाया गेला असून संबंधित अभियंता कडून वसूल करण्यात यावे अशी मागणी नागरिक उपस्थित करीत आहेत. संजय गांधी भाजी मंडई मध्ये प्रशासनाच्या वतीने शेडचे काम सुरू करण्यात आले आहे.
शेड तयार करण्यासाठी अनेक ठिकाणी जेसीबीच्या साह्याने खड्डे करण्यात येणार आहेत. केवळ दोन महिन्यापूर्वीच मंडई मध्ये ६ ते ९ जूनच्या दरम्यान १२ लाख रुपये खर्च करून काँक्रिटीकरण करण्यात आले होते, जर प्रशासनाला मंडई मध्ये शेड उभाराचे होते तर काँक्रिटीकरणाचा खर्च का करण्यात आला असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. शेड उभारण्यासाठी अनेक ठिकाणी जेसीबीने खड्डे केल्यामुळे संपूर्ण काँक्रीट उखळून जाणार आहे. जर प्रशासनाला मंडई मध्ये शेड उभारायचे होते तर काँक्रिटीकरणाचा खर्च का करण्यात आला असा प्रश्न आता निर्माण झाला आहे, दरम्यान मंडई मध्ये नियोजत प्रस्ताव करणाऱ्या संबंधित अभियंता कडून झालेला संपूर्ण खर्च वसूल करण्यात यावा.
नागरिकांच्या कर रुपातून गोळा झालेल्या पैशांची अशी बरबादी केल्याने नागरिकात नागरिकात रोष व्यक्त होत आहे, आर्थिक फायद्यासाठी असे पैशाची बरबादी करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे, दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच संबंधित अभियंता कडून काँक्रिटीकरणावर झालेला संपूर्ण खर्च वसुल करण्यात यावा अशी मागणी खडकीकर करीत आहेत.