भाजप अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष राजुभाई सत्तारमेकर यांचा स्तुत्य उपक्रम
पंढरपूर प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय मा. आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे पंढरपूर शहराध्यक्ष राजूभाई सातारमेकर व उद्योगपती बाळासाहेब कौलवार यांच्या वतीने पंढरपूर शहरातील लोकमान्य विद्यालय पंढरपूर व नगरपालिका उर्दू शाळा पंढरपूर येथे शालेय विद्यार्थ्यांना १०० शालेय बॅग वाटपाचा कार्यक्रम व. पाणी बॉटल वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.
सदर कार्यक्रमा प्रसंगी युवक नेते रोहनजी प्रशांतराव परिचारक यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष राजुभाई सातारमेकर यांच्या वतीने रोहन परिचारक यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना जवळपास 100 स्कूल बॅग वाटप करण्यात आले. तसेच उद्योगपती बाळासाहेब कौलवार यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना पाण्याच्या बॉटल देण्यात आल्या.
भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष राजूभाई सतारमेकर आणि उद्योगपती बाळासाहेब कौलवार यांनी आ. प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पांडुरंग परिवार आणि युवक नेते रोहन परिचारक यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
सदर कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी, शिक्षक वृंद, प्रमुख पाहुणे मा.श्री. रोहन परिचारक यांच्यासह परिसरातील भाजप अल्पसंख्याक विभागाचे कार्यकर्ते, अल्पसंख्यांक बांधव, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी युवानेते रोहन परिचारक यांनी बोलताना सांगितले की, आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे शहर अध्यक्ष राजुभाई सतारमेकर यांनी राबवलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असून या उपक्रमातून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक रोहन परिचारक यांच्यावतीने करण्यात आले आहे.
एका सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांने आ. प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करत सदर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केल्याबद्दल पांडुरंग परिवारातील सर्वसामान्य कार्यकर्ते आणि भाजपचे पदाधिकारी यांच्याकडून राजूभाई सतारमेकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अल्पसंख्यांक मोर्चाचे पंढरपूर शहराध्यक्ष राजूभाई सतारमेकर, उद्योगपती बाळासाहेब कौलवार, हाजी सादिक बेद्रेकर, रफिक करमाळकर , फिरोज मुंढे , अहमद (बाबा) भडाले, सलिम शेख (जनाब) सादिक शैख, अफजल कुरैशी, हैदर नाडेवाले, सिकंदर बागवान, इम्रान मणेरी, वसीम तांबोळी, इस्माईल नाडेवाले, बशीर तांबोळी, आदिनीं परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमास विविध प्रभागातील मा. नगराध्यक्ष, मा. नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, पांडुरंग परिवारातील सदस्य, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे सर्व पदाधिकारी, अल्पसंख्यांक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते