लोणंद प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्यासंग्रामामध्ये सशस्त्र क्रांतीचा लढा राजे उमाजी नाईक यांनी सुरू करून ब्रिटिश सरकारला चौदा वर्ष सळो की पळो केले.या प्रेरणादायी रणसंग्रामातून आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत. साताऱ्याची भूमी सामाजिक क्रांतीची, हुतात्म्याची व थोर महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या 232 व्या जयंतीनिमित्ताने जिल्हा परिषद शाळा तांबवे तालुका फलटण येथे नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
याप्रसंगी सुजन फाउंडेशनचे अध्यक्ष अजित जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अजित जाधव अध्यक्ष सुजन फौंडेशन यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका संगीत गोरड मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्राच्या विकासासाठी शिक्षक हा खूप महत्त्वाचा घटक व राष्ट्रशिल्पकार आहे.जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता गोरड, नंदिनी चांगण व अस्लम मणेर आणि स्वाती घोडके यांच्या तीन दशकाहून अधिक ज्ञानदानाच्या पवित्र कार्याबद्दल सुजन फौंडेशनच्या वतीने शाल महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा व गुबालपुष्प देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी शिक्षणप्रेमी सायली शिंदे व वनस्थळी कार्यकर्त्या अर्चना शिंदे यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्लम मणेर यांनी केले .सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.आभार स्वाती घोडके यांनी मानले.