जनसंवाद रथ दारोदारी पोहोचणार -तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे
पंढरपूर प्रतिनिधी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून जनसंवाद यात्रेचे देशभर आयोजन करण्यात आले असून, पंढरपूर तालुक्यातील या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ रविवारी भोसे येथून करण्यात आला. याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हा तसेच तालुका स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते.
भोसे येथून सुरुवात झालेली ही जनसंवाद रथयात्रा, आता तालुक्यात दारोदारी पोहोचणार असल्याचे मत तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे यांनी व्यक्त केले.
रविवार दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता काँग्रेसची जनसंवाद यात्रा
पूर्ण ताकदीने तयार झाली. यावेळी बनवण्यात आलेल्या जनसंवाद रथाचे पूजन नारायण कोरके यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्व. इंदिराजी गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश गंगेकर, जिल्हा सचिव राजू उराडे, राष्ट्रवादीचे गणेश पाटील, मा. जि.प. सदस्य अतुल खरात, काँग्रेसच्या ग्राहक संरक्षण सेलचे जिल्हाध्यक्ष संग्राम जाधव, हमाल माथाडी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटोळे, जिल्हा उपाध्यक्ष समाधान रोकडे, जिल्हा युवक सचिव गणेश सुतार, जनसेवा विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष दीपक पिंजारी, काँग्रेसच्या किसान सेलचे तालुकाध्यक्ष अक्षय शेळके, राष्ट्रवादीचे कृष्णात माळी, नारायण कोरके, विश्वनाथ भिंगारे, काँग्रेसचे देवानंद इरकल आदी मान्यवर उपस्थित होते.
देशातील मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत, ही जनसंवाद रथयात्रा गावोगावी दारोदार पोहोचणार आहे. भाजपा सरकारच्या काळात महागाईने उच्चांक गाठला, बेरोजगारीने कळस केला, रोजगारनिर्मिती झालीच नाही. इंधन दरवाढ, शेतमालाचे पडलेले भाव,शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या खतांचे चढे भाव, नोटबंदीचा फसलेला डाव, जीएसटीचा जनमानसावरील प्रभाव, यासह अनेक मुद्दे या जनसंवाद यात्रेतून, नागरिकांना आकर्षित करत आहेत. काँग्रेसची ही जनसंवाद यात्रा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आ. प्रणिती शिंदे, जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुक्यात दारोदारी पोहोचणार असून, नागरिकांना जागृत करणार असल्याची प्रतिक्रिया तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे यांनी याप्रसंगी दिली.
यावेळी अनिल अडगळे, राजू गायकवाड, शंकर इंगळे, नवनाथ मदने, नवनाथ नाईकनवरे, कैलास कोरके, आप्पा अडगळे, बशीर मुलानी, समाधान कोरके, सचिन आडगळे यांच्यासह अनेक काँग्रेसप्रेमी नागरिक उपस्थित होते.

