सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिका, सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालय व सोलापूर जिल्हा क्रीडा परिषद अंतर्गत आयोजित जिल्हास्तर तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन दिनांक 4 ते 5 सप्टेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलच्या खालील विद्यार्थ्यांची शालेय विभाग स्तरावर निवड झाली.
यज्ञेश्वर रमेश पाटील :- सिल्वर मेडल
हर्षवर्धन संजय कुडगुंटे :- ब्राँझ मेडल
अमृता दत्तात्रय शृंगारपुरे :- ब्राँझ मेडल
अर्पिता अजय लिंगरकर :- ब्राँझ मेडल
नारायणी मुदे्दश बासुतकर :- ब्राँझ मेडल
सिद्धी धीरज पांडे :- ब्राँझ मेडल
या सर्व खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
या सुयशाबद्दल श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुलाचे चेअरमन श्री धर्मराज काडादी तसेच श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे सदस्य डॉ. राजशेखर येळीकर,श्री भीमाशंकर पटणे, श्री गुरुराज माळगे, श्री. मल्लिकार्जुन कळके
तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री योगेश राऊत पर्यवेक्षक श्री शिवराज बिराजदार व सर्व शिक्षक वृंद यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले. विजेत्या खेळाडूंना क्रीडाशिक्षक श्री पवन भोसले यांनी मार्गदर्शन केले.