सोलापूर प्रतिनिधी
सिंहगड पब्लिक स्कूलचा विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा गुणांना वाव देण्याचा तसेच त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी नेहमीच प्रयत्न केला जातो. त्याचीच प्रचीती म्हणजे या वर्षी झालेल्या खालीलप्रमाणे विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी.
दि. २५.०८.२०२३ रोजी सोलापूर सहोदया यांच्याद्वारे पार पडलेल्या गायन स्पर्धेत मोठ्या गटात साक्षी पाटकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला तसेच लहान गटामध्ये तनिष्का शिंदे हिने देखील द्वितीय क्रमांक पटकावला.
या वर्षी सोलापूर येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फूटबॉल कप १७ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये सिंहगड पब्लिक स्कूलने उत्तम कामगीरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.
जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून घेण्यात येणाऱ्या तालुकास्तरीय आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये मुलांच्या १४ व १७ वर्षाखालील वयोगटामध्ये सिंहगड पब्लिक स्कूलच्या दोन्ही संघांनी प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दोन्ही संघ पात्र झाले आहेत.
दि.२८.०८.२०२३ रोजी झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये (Athletics) १४ वर्षाखालील मुलांमध्ये अतुलकुमार सिंग २०० मी. धावणे (प्रथम), सुयश भोसले ६०० मी. धावणे (प्रथम), विरांश वर्मा- थाळी फेक (प्रथम) व ४०० मी. धावणे (द्वितीय), सर्वेश केवटे १०० मी. धावणे (तृतीय), तसेच ४X१०० मी. रिले संघ (प्रथम).
१४ वर्षाखालील मुलींमध्ये अनुष्का गायकवाड – गोळाफेक (द्वितीय) तसेच ४X१०० मी. रिले संघ (द्वितीय).
१७ वर्षाखालील मुले – शंभो पाटील - तिहेरी उडी (प्रथम), रिषभ दळवी - भालाफेक (द्वितीय), हर्षवर्धन गवळी ४०० मी. धावणे (द्वितीय) तसेच ४X१०० मी. रिले संघ (द्वितीय).
१७ वर्षाखालील मुली – राजनंदिनी जाधव - तिहेरी उडी (प्रथम), कल्याणी शिंदे – भालाफेक व थाळीफेक (द्वितीय) तसेच ४X१०० मी. रिले संघ (द्वितीय), ४X४०० मी. रिले संघ (द्वितीय).
दि. ०१.०९.२०२३ रोजी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धां झाली- १४ वर्षाखालील मुलांमध्ये- अभयसिंह यादव, समर्थ जगताप तसेच १४ वर्षाखालील मुलींमध्ये - तनया गवळी आणि १७ वर्षाखालील मुलींमध्ये- श्रेया मोरे, स्नेहां देशमुख अशा एकूण पाच खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री संजय नवले यांचे प्रोत्साहन लाभले तसेच शाळेच्या प्राचार्य निखहत शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व विजयी विद्यार्थ्यांना कला शिक्षक दशरथ शिंदे तसेच क्रीडा शिक्षक सीमा मादगुंडी, प्रशांत जाधव व अजित कट्टे यांचे मार्गदर्शन लाभले.