बारामती प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष OSD मंगेशजी चिवटे व मुख्यमंत्री कार्यालयाचे वैद्यकीय कक्ष प्रमुख राम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 2/ 9/ 2023 रोजी श्री क्षेत्र कनेरी तालुका बारामती जिल्हा पुणे येथे महाआरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे.
या शिबिरामध्ये विविध प्रकारचे तज्ञ डॉक्टर आलेल्या भाविक भक्तांच्या रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी करून मोफत औषध वाटप करण्यात येणार आहे आणि गरज भासल्यास मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून गरीब रुग्णांना आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या अनमोल संधीचा आयुष्य लाभ घ्यावा महा आरोग्य शिबिरामध्ये प्रमुख उपस्थिती मुख्यमंत्री कार्यालयाचे वैद्यकीय कक्ष प्रमुख ओ एस डी मंगेशजी चिवटे हे असणार आहेत. तरी या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा .असे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे उपजिल्हाप्रमुख सतीश महादेव गावडे यांनी केले आहे.