पुणे प्रतिनिधी
पं.शंकर वसंत फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने पं.गोविंद भिलारे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्ताने स्मृती संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते, सुरुवातीला पद्मश्री तालयोगी पं.सुरेशजी तळवलकर,पं.डालचंद शर्मा, प्रमोद घोरपडकर,मनिषाताई भिलारे, मिलिंद कुलकर्णी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
त्यानंतर प्रथम सत्र ख्यातनाम संतूरवादक पं शिवकुमार शर्मा यांचे शिष्य शंतनू गोखले यांच्या संतूरवादनाने गुंफले,त्यांनी सुरुवातीला राग चारुकेशी सादर केला, त्यामध्ये आलाफ,झाला,आणि झपतालामध्ये अप्रतिम वादन सादर करत नंतर द्रुत तीनतालाने वादनाची समाप्ती केली,त्यांना तितकीच अप्रतिम साथसंगत तबला कार्तिक स्वामी यांनी समर्थपणे केली,त्यानंतर मध्यांतरात पं.गोविंद भिलारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भुषण भागवत याला शिष्यवृत्ती देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर पं.सुरेशजी तळवलकर यांनी गोविंद भिलारे यांच्या आठवणी सांगत निष्ठेने गुरुसेवा कशी करावी आणि विद्या कशी प्राप्त करावी हा गोविंद चा चांगला गुण होता, अतिशय मेहनतीने विद्या प्राप्त करून अनेक विद्यार्थी घडवले पण नियतीने तो हिरा हिरावून घेतला अतिशय दुःख वाटतय,तो वारसा शिष्य परिवाराच्या वतीने पुढे चालविला जातोय त्यामुळे सदैव गोविंदाच्या स्मृती कायम राहतील सांगितले,त्यानंतर ख्यातनाम नाथपंथी घराण्याचे पखवाज वादक पं.डालचंद शर्मा यांच्या घराणेदार पारंपरिक पखवाज वादनाला सुरुवात झाली, सुरुवातीला गणेशपरण आणि पं.वसंतराव घोरपडकर यांच्या शिवपरणाने केली,त्यानंतर अनेक दुर्मिळ बंदिशी सादर करत रसिकश्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
त्यामध्ये चक्रदार,कमाली चक्रदार,अनाघती परणे,नौहक्का,कुदोसिंह महाराज,पानसे घराण्याच्या अप्रतिम बंदिशी सादर अक्षय शेवटी रेले वाजवत कार्यक्रमाची सांगता केली,त्यांना तितकीच प्रतिम लहरासाथ मिलिंद कुलकर्णी यांनी केली, संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुरा आफळे हिने सुंदर केले,सदर कार्यक्रमाला मा.नगरसेवक आप्पासाहेब बेणूसे पं.पांडुरंगआप्पा दातार,पं.अमोल निचळ, दासोपंत स्वामी,पांडुरंग पवार,तसेच अनेक कलारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्ञानेश्वर दुधाणे यांनी काढलेली आकर्षक रांगोळी रसिकांच लक्ष वेधून घेत होती संगीत समारोह यशस्वी करण्यासाठी भिलारे परिवार त्यामध्ये मनिषाताई भिलारे,श्रेया भिलारे,शिवतेज भिलारे, आणि शिष्यपरिवार आकाश तुपे,सिध्देश उंडाळकर,ज्ञानेश कोकाटे, गणेश चौधरी,मनिष तांबोसकर,सप्नील सुर्यवंशी, ज्ञानेश्वर दुधाणे,भुषण भागवत, ज्ञानेश्वर हिरगुडे, आदींनी अधिक परिश्रम घेत संगीत समारोह यशस्वी केला.