म्हसवड प्रतिनिधी
खंडोबा गणेश मित्र मंडळ चांदणी चौक म्हसवड आयोजित भव्य प्लास्टिक बॉल नाईट क्रिकेट स्पर्धेचे फायनल मॅच व बक्षीस ट्रॉफी वितरण समारंभ ०५/०८/२०२३ रोजी संध्याकाळी पार पडला.
यावेळी प्रमुख उपस्थित माण खटाव चे दमदार आमदार जयकुमार गोरे, म्हसवडचे एपीआय भुजबळ , इंजि.सुनील पोरे , माण तालुका भाजपा अध्यक्ष शिवाजीराव शिंदे , मा.नगराध्यक्ष नितीनभाई दोशी , मा. उपनगराध्यक्ष डॉ. वसंत मासाळ , ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब टाकणे , भाजपा म्हसवड शहराध्यक्ष बी एम अबदागिरे , दहिवडीचे मित्र सिद्धार्थ गुंडगे , संजयजी जगताप ,विजयशेठ बनगर , लुनेशभाऊ वीरकर ,बाळासाहेब पिसे , सोमनाथ केवटे , निखिल माळी , सागर नामदे , रोहित सरतापे ,बाबूभाई मुल्ला ,प्रवीण केवटे , सागर चव्हाण ,अभय लोखंडे , आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित होते.
या सामन्याचे सूत्रसंचालन म्हसवडचे उत्कृष्ट कलाकार महेश सोनवले यांनी केले व त्यांना उत्कृष्ट अशी साथ आकाश मेंढापुरे यांनी दिली.
या सामन्याचे प्रथम पारितोषिक विजेते ठरले ते बजरंग बली संघ म्हसवड, दुतीय पारितोषिक विजेते ठरले ते एमजी बॉईज माळी गल्ली म्हसवड, तृतीय पारितोषिक विजेता ठरले ते रॉयल बॉईज व चतुर्थ पारितोषिक विजेते ठरले ते डी एक्स ग्रुप या सर्व विजेत्यांचे आयोजक संयोजक यांच्याकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
हे क्रिकेट चषक उत्कृष्टरित्या शांततेच्या वातावरणात पार पडण्यासाठी ऍड.शुभम पोरे ,उत्कर्ष शिंदे , बाळू तावसे ,चैतन्य शिंदे, बापू भिंगारे ,गणेश नलवडे ,आकाश पिसे सनी शिंदे, विजय शिंदे ,व सर्व खंडोबा गणेश मंडळ चांदणी चौक म्हसवड यांनी अथक परिश्रम घेतले म्हसवड परिसरातील क्रिकेट शौकिनांची मांदियाळी दिसुन आली व अनेकांनी संयोजकांना धन्यवाद दिले.