पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची सभा आज दिनांक 06 ऑगस्ट, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता मा.सह अध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज (औसेकर) यांचे अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास, पंढरपूर येथे संपन्न झाली.
सदरहू सभेस मा.सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ॲड.माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ हे समक्ष व भास्करगिरी बाबा, अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प.शिवाजीराव मोरे हे दुरदृष्य प्रणालीद्वारे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व लेखा अधिकारी अनिल पाटील उपस्थित होते. सदर सभेत खालीलप्रमाणे निर्णय सर्वानुमते घेण्यात आले.
1. मंदिर विकास आराखड्यास मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र शासनाच्या आभाराचा ठरावा पारीत करण्यात आला.
2. अधिकमास कालावधीत भाविकांना देण्यात आलेल्या सोई सुविधांचा आढावा घेण्यात आला.
3. आस्थापनेवरील मयत कर्मचारी अमोल वाडेकर यांच्या वारसास रू.1.00/- लक्ष इतकी मदत देण्यात आली.
4. QR कोडद्वारे देणगी स्वीकारणे कामी संगणक प्रणाली विकसित करण्याचे ठरले.
5. प्रतिवर्षीप्रमाणे सन 2024 साठी दैनंदिनी व दिनदर्शिका छपाई करून कार्तिकी एकादशी 2023 रोजी प्रकाशित करण्याचे ठरले.
6. ऑल इंडिया इन्स्टि ट्युट ऑफ मेडिकल सायन्सची श्रीक्षेत्र पंढरपूर येथे सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासनास प्रस्ताव सादर करण्याची सुचना मा.सदस्य ह.भ.प.शिवाजीराव मोरे यांनी मांडली. त्यास मंजुरी देण्यात आली.
7. मंदिर विकास आराखड्यातील सर्व प्रस्तावित कामांची स्थळ पाहणी करण्यात आली व सदर कामांचे अंदाजपत्रक व डिझाईन तयार करून लवकरात लवकर कामास सुरवात करण्याचे ठरले आहे.