मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
आपण समाजाचे काहीतरी देणेकरी लागत असून समाजाचे ऋण फेडणे आपले आद्य कर्तव्य आहे. या संकल्पनेतून शिधावाटप अधिकारी अश्विन रोहिणीकर यांनी आपल्या सहकारी वर्गाला सोबत घेऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत रक्तदान शिबिराचे दि.११ ऑगस्ट २०२३ शुक्रवार रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, रक्तदान करू या.
माणुसकी जपू या संकल्पनेतून शिधावाटप कार्यालय क्रमांक २६-ड, एम टी एन एल बिल्डिंग तळमजला एम आय डी सी पोलीस स्टेशनं समोर अंधेरी (पूर्व ) येथे मोठ्या प्रमाणात रक्तदात्यानी रक्तदान करावे असे आवाहन आयोजक शिधावाटप अधिकारी अश्विन रोहिणीकर व सहा. शिधावाटप अधिकारी कर्मचारी वर्गाने केली असून अधिक माहितीसाठी मोबाईल नं 9619982839/ 8850419285 वर संपर्क करा असे आवाहन करण्यात आले आहे.