एटापल्ली प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आदेशानुसार तसेच विनायक राऊत पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख अनिल देसाई शिवसेना सचिव प्रकाश वाघ पूर्व विदर्भ समन्वयक महेश केदारी गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच अहेरी शिवसेना जिल्हाप्रमुख रियाज शेख यांच्या अध्यक्षतेखाली आणि मनीष दुर्गे तालुकाप्रमुख एटापल्ली युवा सेना तालुका अधिकारी अक्षय पुंगाटी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत एटापल्ली तालुक्यात एकूण चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणानुसार बैठकीत विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख यांच्या पदनियुक्तीबाबत चर्चा करण्यात आली.
एटापली तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत नुसार शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख नवनियुक्ती करण्यासंबंधी नियोजित आराखडा तयार करण्यात आला तसेच शिवसेना महिला आघाडी युवासेना व युवतीसेना या प्रकारे शिवसेना पक्ष संघटन बांधणीचे कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे या बैठकीत निर्णय घेण्यात आले त्याचप्रमाणे पक्ष संघटनाचे कार्य करीत असताना सतत मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी मुळे झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई मिळण्या संबंधी शासनाकडून तात्काळ पंचनामे व्हावे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासंबंधात एकजुटीने सर्व शिवसैनिक व पदाधिकारी कामाला लागावे आणि तालुक्यातील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी निवेदनाद्वारे शासनाकडे पाठपुरावा करून लोकहितार्थ समस्या सोडविण्याचे प्रयत्न करावे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही पद्धतीने संबंधित अधिकारी वर्गाशी वेळ घेऊन चर्चा करण्यात यावी लोकांचे समस्या मार्गी लागेपर्यंत कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता जनसेवा करावी शिवसेना ८० % समाजकारण २०% राजकारण हेच ध्येय धोरण ठेवून जनसेवा कार्य करण्यासंबंधीत सखोल चर्चा व संवाद करण्यात आली.
या चर्चा दरम्यान जिल्हाप्रमुख रियाज शेख तालुकाप्रमुख मनीष दुर्ग युवा सेना तालुकाप्रमुख अक्षय पुंगाटी नगरसेवक येतापल्ली नामदेव हिचामी यांनी या बैठकीत नियोजित रूपरेषा बनवून आज पासून कार्यची सुरुवात केलेली आहे. बैठकीत राहुल आदे,अमीर शेख ,बल्लू पुसली, प्रमोदजी देवतळे,दीपक दत्ता असे प्रमुख पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते.