पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने उपमुख्याधिकरी सुनील वाळूजकर यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी कर अधिकारी सुप्रिया शिंदे, कार्यालय अधीक्षक जानबा कांबळे, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, अनिल अभंगराव, दर्शन वेळापुरे, जिल्हा हिवताप अधिकारी शुभांगी आधटराव , चेतन चव्हाण ,संतोष एतवाडकर , अभिजीत घाडगे हे उपस्थित होते.