मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
काठमांडू नेपाळ येथे ७ व्या एशियन गोजू रीव्ह कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत गोरेगाव मुंबई येथील रुतुजा भगत व अर्पित भगत या भावंडांनी गोल्ड मेडल मिळवुन भारतीय संघाला प्रथम क्रमांकाची चम्यियनशिप मिळवून दिली.
ही दोघे भावंड संत निरांकरी मंडळाचे सेवादल म्हणून कार्यरत आहेत.घरची परिस्थिती अत्यंत बिकट असली तरी अभ्यासाबरोबर कराटे व निरंकारी मंडळाचे काम ते आवडीने करीत असतात.मेहनत व सद्गुरूंचे आशीर्वाद यामुळे आम्ही हे यश मिळवू शकलो असा विश्वास या भावंडांनी स्पर्धा जिंकल्यावर व्यक्त केला.या यशासाठी आज
संत निरंकारी मंडळ गोरेगाव ब्रँच तर्फे मुखी. टी.एस् विश्वकर्मा, संचालक जगदीश वाडेकर यांच्या मार्गदर्शन खाली रुतुजा व अर्पित यांचा सत्कार यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

