महुद प्रतिनिधी
महुद मधील सर्व नागरीकांना सांगु इच्छिते की... सध्या महुद गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा चालु असुन आपलं गावास पिण्याच्यासाठी जे पाणी येते ते शिरभावी योजनेतुन व चिकमहुद येथील तामजाई विहरीवरुन सध्या आपले कॅनोलचे पाणी दोन दिवसातच बंद झाले मुळे चिकमहुद येथील विहिरीतील पाणी साठा संपलेला आसलेमुळे. चिकमहुदचे पाणी येऊ शकत नाही.अशी माहिती सरपंच संजीवनी कल्याण लुबाळ यांनी सांगितली आहे.
यावेळी लुबाळ म्हणाल्या,आपल्या गावातील ग्रामपंचायत सदस्यांनी व कार्यकर्त्यांनी स्वता श्रमदान करुन पाणी आडवुन,पाटातील व ओढयातील कचरा काढुन टाकला आहे.परंतु कॕनाॅलचेच पाणी बंद झालेमुळे पाणी विहिरीला नाही.तसेच शिरभावी योजनेवरील विजेचा घोटाळा सतत होत आसतो.आजमितीला विजेचा घोटाळा आहेच.आणि महत्वाचे म्हणजे शिरभावी योजनेतुन मिळनारे पाणी हे आपण विकत घेत आसतो.त्या पाण्याची पाणीपट्टी काही लाखाच्या घरात थकीत आहे.तरीही आंम्ही ग्रामपंचयतीच्या माध्यमातून ज्या काही सुविधा नागरीकांना देता येतील त्या देतच असतो.एकतर कोरोना काळापासुन आंम्ही वसुलीसाठी तगादा लावतच नाही.आमचे कर्मचारी एक-एकाच्या दारात चार-चार वेळा जाऊन येतात काही नागरीक पैसे भरतातही परंतु काहींची परिस्थीती म्हणा किंवा इतर अडचणी आंम्ही समजुन घेऊनच करवसुली करत आसतो कुणालाही मुद्दामहुन अडचणीत आणत नाही त्यामुळे शिरभावी पाणी बंद आहे.
एकतर पाऊस लांबलेला आसलेमुळे बहुतांश गावात पिण्याच्या पाण्याची अडचण जाणवु लागली आहे.निसर्गाच्या अवकृपेमुळे हे संकट ओढवले आहे..आशा कामामध्ये आंम्हाला राजकारण आनायचे नसुन.गावातील सर्व सदस्यांचे आपापल्या वार्डामध्ये सलोख्याचे संबंध असतात त्या संबंधांच्या आधारे पाणीपट्टी भरुन घेण्यासाठी सदस्यांनी जबाबदारीने पुढाकार घ्यावा व नागरिकांच्या अडचणीं सोडवण्यास हातभार लावावा.तसेच रस्त्याच्या व इतर कामाच्या बाबतीत सुद्धा ग्रामपंचायत सतर्क आहेच आता झालंय कस. तुम्हाला किंवा तुमच्या मर्जीतील व्यक्तींना ग्रामपंचायतीने कामे दिली नाहीत की.ती कामे निकृष्ट झाली म्हणून बोभाटा करणे आरोग्य आहे.आपण नियमाप्रमाणे कामे देतो व ती कामे दर्जेदार करुन घेत आहोत. असे ही लुबाळ यांनी सांगितली.
आज मितीला महुद गावच्या शेतकरी कामगार पक्षाने व डॉ. भाई बाबासाहेब देशमुख युवा मंचने स्वखर्चाने गावातील पाणी टंचाई लक्षात घेऊन नागरिकांना पाणी देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आलेला आहे. तो खरच अभिनंदनीय व जबाबदारीचे भान ठेवणारा आहे.सध्याची परिस्थीती पाहुन काही पक्षातील नेते व कार्यकर्ते यांनी पुढे येऊन असेच कार्य करावे.व हे गाव आपले आहे.आपण गावचे आहोत हे लक्षात ठेवावे.असे सरपंच संजीवनी कल्याण लुबाळ यांनी सांगितली आहे.


