नवी मुंबई प्रतिनिधी सुभाष हांडे देशमुख
मुंबई येथील आरसीएफ एक्स एम्प्लॉईज सोशल फोरम या कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संस्थेच्या विद्यमाने १ जुलै या डॉक्टर्स डे चे औचित्य साधून आरसीएफ मधे वैदयकीय सेवेत कार्यरत असलेल्या डॉक्टरांचा, त्यांच्या कर्तव्यनिष्ठेने करीत असलेल्या मानवसेवाप्रती आरसीएफ हॉस्पीटलच्या प्रांगणात आर. सी. एफ. चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एस. सी. मुदगेरीकर यांच्या हस्ते नॅपकिन बुके व भाकरवडीचे पाकिट देऊन गौरव करण्यात आला.
या गौरव सोहळ्यात डॉ. स्मिता मुदगेरीकर, कंपनीचे भूतपूर्व सीएमडी उदय शंकर झा, वित्त संचालिका नजहत शेख, टेक्निकल संचालक मिलिंद देव, मुख्य सतर्कता अधिकारी समीर रस्तोगी, कार्यपालक संचालक जी.बी. शर्मा, कार्यपालक संचालिका सुनिता शुक्ला, डॉ. रेखा देवाडिगा, डॉ. गोपाळ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. अनामिका शेंडे, डॉ. पंकज शिंपी, डॉ. स्नेहल लवाटे, डॉ. हर्षाली लोखंडे, डॉ. सलुजा, डॉ. वैशाली आढाव, डॉ. मंजुषा पेटकर, डॉ. सुचिता महाडिक, डॉ. निलेश सरफ, डॉ. रजस मुदगेरीकर, डॉ. गोपाळ पाटील आदि डॉक्टरांचा गुणगौरव करण्यात आला.
फोरमचे अध्यक्ष व्ही. डी. पाटील यांनी प्रास्ताविकात मान्यवरांचे स्वागत करून सांगितले की आरसीएफ मध्ये २००७ पासून फोरमच्या माध्यमातून डॉक्टर्स डे दरवर्षी न चुकता साजरा करण्याची परंपरा अहव्यातपणे चालू ठेवली आहे. डॉक्टर निस्पृहपणे देत असलेली सेवा खरोखरच कौतुकास्पद आहे. म्हणूनच त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यास फोरमला आनंद आणि समाधान वाटते.
आरसीएफ चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. मुदगेरीकर डॉक्टरांशी संवाद साधताना आरसीएफ फोरमच्या कार्याचे कौतुक करुन म्हणाले की दरवर्षी न चुकता हे फोरमचे पदाधिकारी येथे प्रत्यक्ष येऊन आपल्या सर्वांचा सन्मान करतात ही अत्यंत अभिमानाची व कौतुकास्पद बाब आहे. अस सांगून ते पुढे म्हणाले की, आपण आरसीएफ कुटुंबीयांप्रति देत असलेली वैद्यकीय सेवा अतुलनीय आहे. खरे तर, आपणांस परमेश्वरानेच ही मानवसेवा करण्याची संधी उपलब्ध करुन दिलेली आहे. ती आपण अधिक जाणीवपूर्वक व तत्परतेने करत राहावी ही अपेक्षा आहे.
उदय शंकर झा या प्रसंगी बोलताना म्हणाले की, आपला सन्मान करण्याचे भाग्य आम्हाला लाभते ही आनंदाची बाब आहे. आपण आरसीएफ कुटुंबियांना देत असलेली वैदकीयसेवा ही कंपनीच्या आपल्या बांधवांच्या आणि कुटुंबीयांच्या द्रुष्टीनेही खूप महत्त्वाची असून त्यामुळे कंपनीतील काम करणारे आपले सहकारी बंधू भगिनी अधिक उत्साहाने आपली कंपनीतील सेवा देऊ शकतात. असं सांगून ते म्हणाले की, श्री. मुदगेरीकर यांच्या नेतृत्वाखाली आरसीएफ नेत्रदीपक अशी प्रगती साधत आहे ही आनंदाची गोष्ट आहे.
हॉस्पीटलच्या मुख्य व्यवस्थापिका डॉ. रेखा देवाडीगा यांनी संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. सर्वस्वी प्रभाकरराव साळुंखे, सुबोध मोरजकर, हरदयाल सिंग, शिरीष सालोडकर, डी. टी. बारकुंड यांनी उपक्रम यशस्वी होण्यास चांगला सहयोग दिला.
शेवटी प्रभाकरराव साळुंखे यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे यथोचित आभार मानले.

