पळशी प्रतिनिधी
सन 2023 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य शासनाची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सेट परीक्षांचा निकाल नुकताच लागला.यामध्ये सोनके गावचे सुपुत्र प्रा.विजय बाळू खिलारे हे इतिहास विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही पित्याचे छत्र हरपले असताना आईच्या कष्ट,मेहनत आणि आशीर्वादाने व विजूच्या जिद्द,चिकाटी आणि अभ्यासू वृत्तीने अशा प्रकारच्या परिस्थितीतून मार्ग काढत यशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला व त्यात तो सफल झाला आहे.गरीब,होतकरू व परिस्थितीने हतबल न होता आलेल्या संकटाना दोन हात करून लढण्याची उर्मी निर्माण करणारा युवक म्हणून त्याची सर्व गावभर व परिसरातून चर्चा होत आहे.खरोखर त्याचे हे यश वाखाणण्याजोगे व कौतुकास्पद आहे.
त्याच्या या यशामध्ये त्याची आई राजाबाई,मामा लक्ष्मण पाटोळे,हरिदास मस्के यांचा सिंहाचा वाटा आहे.त्याच्या भावी वाटचालीस अनंत शुभेच्छा देण्यासाठी व यशाचा ,कष्ट,जिद्दीचा सन्मान यावेळी करण्यात आला.विजूचा सन्मान पळशी गावचे पोलीस पाटील प्रा.अशोक लोखंडे सर यांचे हस्ते त्यांचे निवासस्थानी करण्यात आला.यावेळी प्रा.हरिदास मस्के सर,दत्ता सुरवसे,सत्यवान केंजळे,रामदास लोखंडे,अवधूत बनसोडे,सचिन गेजगे व लोखंडे पाटील कुटुंबीय आणि मित्र परिवार उपस्थित होते.


