ज्यांनी ज्यांनी माझ्या आयुष्याला आकार देण्यासाठी ज्ञानाचा दिपस्तंभ झाले अशा सर्व गुरुचरणास मी विनम्र वंदन करते.
#*अज्ञान अंधकार दूर करोनिया
ज्ञान प्रकाशाची ज्योत लावूनीया,
प्रेरणा देतात आपल्या सृजना,
गुरु अर्थ देतो आपल्या जीवना,
क्षणोक्षणी पदोपदी जाणवी ती मना.
" शून्याची किंमत पूज्यच आहे" पण त्याच शून्याच्या पाठी एक लावले असता त्या शून्याची किंमत दस पटीने वाढते. त्याच प्रमाणे या अफाट विश्वात माणसांची किंमत शून्य पण त्यांच्या जीवनात गुरु आला तर तो माणूस अजिंक्यच. "" ज्ञानाचे ईश्वर असून ज्ञानदेव गुरूला मानत होते कारण ज्ञानापेक्षा ते गुरु चे महत्व जास्त जाणत होते." भारतीय संस्कृती आकाशातील इंद्रधनुष्या प्रमाणे विविधतेने नटलेली आहे. भारतीय संस्कृती ही कृतज्ञता शिकवते. केलेले उपकार जाणणारा म्हणजे कृतज्ञ. विविध सण ,उत्सव आपण कृतज्ञतेतून साजरे करतो. त्याच रीतीने जीवनातील प्रत्येक वळणावळणावर ज्यांच्याकडून काही शिकलो ,विचारांचा प्रकाश मिळाला, ज्ञानाचे संवर्धन झाले, उज्वल आयुष्याला दीपस्तंभ मिळाला. अशा दीपस्तंभाचे स्मरण आणि पूजन करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा
आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. चारही वेदावर ज्यांनी सर्वप्रथम भाष्य केले. वेदाचे ज्ञान दिले असे व्यासमुनी . यांच्या नावाने हे व्यासपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.आपण गुरूंचे पूजन करत असतो गुरु म्हणजे अंधकार दूर करणारा. प्रकाशाची पेरणी करणारा दीपस्तंभ.
हिरे को दे तराश तो किंमत बढ जाती है
जो विद्याधन हो पास तो जिंदगी सवर जाती है
यदि फल ,फुल रखो प्रभू के आगे तो प्रसाद बन जाताहै
अगर शिष्य झुके गुरू के आगे तो इन्सान बन जाता है
" आपल्या जीवनात श्री गणेशा ते संगणेशा असा गुरूचा प्रवास सुरू आहे या प्रवासातील आपण सर्वजण प्रवासी आहोत **आई** हे आपल्या जीवनातील पहिली गुरु गर्भसंस्कारा पासून तिचे बोट धरून
आपण आपल्या जीवन प्रवासाला निघालेलो असतो. गुरु केवळ एका भूमिकेत नाही तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकाकडून आपण काही ना काही शिकत असतो. निसर्ग हा देखील आपला गुरूच आहे उद्याच्या सूर्यप्रकाशात फुलण्यासाठी कळीला रात्रीचा संयम दाखवावा लागतो. सुंदर रोपटयामध्ये रूपांतर होण्यासाठी बी ला स्वतःला जमिनीत गाडून घ्यावे लागते. फुलाची कोमलता ,गंगेची निर्मलता, सागराची विशालता, चंद्राची शीतलता, पृथ्वीची सामावून, घेण्याची क्षमता ही सारी गुरुजवळ पाहायला मिळतात सारी दैवत गुरु या शब्दात सामावलेली म्हणून गुरु हे दैवताचे दैवत आहे.
"" निरीक्षणातून, विचारातून ,संस्कारातून ,मार्गदर्शनातून आपली प्रगतीकडे वाटचाल चालू असते. गुरु व्यक्ती रूपात ग्रंथरूपात वस्तू रुपात ,निसर्ग रूपात, आपल्या अवतीभोवती असतो.
रामायण ,महाभारत या पौराणिक काळापासूनच गुरु परंपरा निर्माण झाली प्राचीन काळात गुरुचे महत्व अनन्यसाधारण होते आज परिस्थिती बदलली विविध तंत्रज्ञान विकसित झाल्याने गुरु ची रूपे बदलली पण अर्थ नाही. "" प्राचीन काळात याज्ञवल्क्य - जनक, जनक- शुक्राचार्य ,सांदिपनी- श्रीकृष्ण सुदामा., परशुराम -कर्ण, विश्वमित्र- श्रीराम लक्ष्मण, धौम्य ऋषि- वेद अरुणी, आर्य चाणक्य -चंद्रगुप्त द्रोणाचार्य -अर्जुन, अगरकर- गांधी रमाकांत आचरेकर -सचिन तेंडुलकर, पाश्चात्य देशात सॉक्रेटिस- प्लेटो, प्लेटो अरिस्टॉटल- सिकंदर अशा जोड्या गुरू-शिष्याचे नाते सांगत असतात.
"" गरुडा कडून पंख घ्यावेत उंच भरारी मारण्यासाठी
सूर्याकडून तेच घ्यावे हे अंधार दूर सारण्यासाठी
पर्वता कडून निश्चय घ्यावा निर्णयावर ठाम राहण्यासाठी
आभाळा कडून विशालता घ्यावी चुका माफ करण्यासाठी
गुरु कडून ज्ञान घ्यावे जीवनात यशस्वी होण्यासाठी"""
शिष्याच्या मनावर ,बुद्धीवर, ज्ञानाचे संस्कार देऊन आकाशाशी गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे गुरू. सुप्त कलागुणांना वाव देऊन विचाराचा ज्ञानस्तंभ म्हणजे गुरू .संस्काराची सावली देणारे आधारवड म्हणजे गुरू, विविध कला आत्मसात करण्यासाठी आपल्याला गुरूची गरज भासत असते. त्याशिवाय शिष्य घडू शकत नाही विविध कला क्षेत्रातही ही अजोड अशा गुरु-शिष्य परंपरा आहेत
" जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरू केला जाणं या उक्तीप्रमाणे आजच्या शिष्याची वाटचाल सुरू आहे माझ्या मते ते गुरु असा हवा ज्याच्या जीवनात ज्ञानाचे आणि जीवनाचे गुरुत्व आलेले आहे दुसऱ्यांच्या उत्कर्षासाठी सतत झटत असतो. गुरु हा सोन्यासारखा नको
कारण सोन्याची झळाळी त्याच्या पुरतीच मर्यादित असते गुरु परिसा सारखा असावा ज्या ज्या वस्तू च्या सानिध्यात जाईल त्या वस्तूचे सोनं बनविण्याची धमक त्याच्यात असावी.
जीवन ही संघर्ष भूमी आहे हे इथे आव्हानांना सामोरे जावे लागते आपण अस्सल 24 कॅरेट सोने बनण्यासाठी आपल्या जीवनात गुरु चे महत्व अनन्यसाधारण असेच म्हणावे लागेल. इतर भौतिक गुरु आपणास ज्ञानार्जनाची मदत करतील ज्याप्रमाणे गुगल, इंटरनेट ,फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर पण संस्काराचं, आत्म चैतन्याचं, आत्मविश्वासाचं ,भावनांचं रोपटं निर्माण करणाऱ्या गुरूची आज जीवनात नितांत आवश्यकता आहे म्हणून गुरू आणि सद्गुरू ही गुरुची दोन रुपे पाहता येतात , गुरु जीवनाला दिशा देण्याचे कार्य करतात तर सद्गुरु हा भवसागर तरुण कसे जायचे याचा मार्ग दाखवतात . संत कबीर आणि आपल्या दोहे मध्ये,"गुरु गोविंद दोनो खडे काखे लागे पाय, गुरु तो बलिहारी आपने ,परमेश्वराकडे जाणारा मार्ग गुरुच दाखवत असतात. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः या भवसागरात गुरुची असंख्य रूपे आहेत कोणते रूप आपल्या जीवनात कधी महत्त्वाचे ठरेल हे सांगता येत नाही म्हणून गुरुची ही विविध रूपे आपण जाणून समजून घ्यायला हवीत आणि जीवनाच्या मार्गावर स्वीकृती रुपात आणावीत. यशाची साक्ष देणारा पावलोपावली मार्गदर्शक ठरणारा शिष्यावर आशीर्वादाची बरसात करणारा , तो गुरु. गुरु आईची भूमिका पार पाडतो मनाला संस्काराचे धडे देऊन सुजाण नागरिक घडवतो. गुरु पिता होतो कच्चा मडक्यावर कर्तव्याची थाप घालून पक्का घडा घडवतो. कधी तो बंधू ची भूमिका पार पाडतो. आपल्या सुख दुःखात सामील होतो.कधी तो ईश्वराची भूमिका घेतो आपल्या विशाल हृदयात शिष्याला सामावून घेतो. कधी मित्रत्वाची साक्ष देतो संकट काळातही सुखाचा मार्ग दाखवतो. मुंडलेल्या तलवारीला धार देण्याचं काम गुरु करतो म्हणूनच तो एक उत्तम कलाकार व कारागीर असतो. आई आईची भूमिका पार पडते.पिता पित्याची भूमिका पार पाडतो.पण आजन्म नात्यांच्या जाळ्यात गुरफटलेल्या गुरु या सर्वांचीच भूमिका पार पाडतो. गुरु कोणाला करावा अगदी छोटी छोटी गोष्ट शिकवणार्या वस्तूला ही गुरु करावा, आपल्या निर्मळ हास्य ना सामावून घेणाऱ्या लहान बाळाला ही गुरु करावा, औषधी वनस्पती सारखे बोल असणाऱ्या वृद्धाला ही गुरु करावा, गुरु निसर्गालाही करावा.जगातील ज्या ज्या गोष्टी कडून काहीतरी निर्मळ आणि पवित्र , उदात्त शिकायला मिळतं त्या त्या गोष्टींना गुरु करावा
माझ्याही आयुष्यात बालपणापासून विविध नात्यांच्या जाणिवेतून ,निरीक्षणातून,, अनुभवातून ,कृतीतून प्राथमिक स्तरापासून ते विद्यापीठ स्तरापर्यंत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत विविध व्यक्तीच्या माध्यमातून मला माझ्या आयुष्याला वळण देणारे मार्ग मिळाले यशस्वी जीवनाचा मूलमंत्र मिळाला. अशा माझ्या सर्व गुरूंना मी शतशत नमन करते.
*# गुरु बिन होता ना कोई अच्छा काम
गुरु बिन होता ना कोई महान
गुरु से होती है एक ऐसी डोर
जो हमे ले जाती है प्रकाश की चारो और *#
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत माझ्या आयुष्याला आकार देणाऱ्या सर्वांनाच गुरुपौर्णिमेच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा
. *#जो जो जयाचा घेतला गुण,.
.... तो तो गुरु मी केला जाण,
गुरु सी आले अपारपण,
जग संपूर्ण गुरु दिसे.*#.
✍️ प्राध्यापिका सविता दूधभाते ✍️
उमा शिक्षण शास्त्र महाविद्यालय पंढरपूर.

