महाद्वार काला विशेष लेख
महाद्वार काला म्हणजे हरिदास नामदास यांचे एकमेकांचे प्रेमाचे घट्ट नाते हे नाते साधे सुधे नाही ते भक्तीच्या प्रेमाचे नाते आहे,महाद्वार काला म्हणजे काय याचे विस्तारपूर्वक वर्णन सर्वांनी केलेच आहेच आज नामदेव राया आणि काला या बद्दल माहिती सांगतो,संत नामदेव रायाची दिंडी आल्यावरच उत्सव सुरू होतो नामदेवरायांचे विद्यमान वंशज दिंडी घेऊन येतात आणि मग पागोटे बांधण्यास सुरुवात होते.
पांडुरंगरायाचे पुजारी पागोटे बांधतात आणि मग काला बाहेर पडतो,नामदेवरायाचे वंशज त्यांना बाहेर घेऊन येतात,नामदेव पायरी पशी येऊन तिथे नमन केले जाते,देवळात पाच प्रदक्षिणा होतात,हे सर्व प्रदक्षिणा कशा करायच्या आणि खांद्यावर काला कोणाला द्यायचा हे ही नामदासच ठरवतात, कालाच्या पुढे डांगे म्हणजे देवाचे सेवाधरी हे दंड घेऊन ऊभे असतात,त्यानंतर काल्याचा अभंग नामदेवरायांचे वंशज म्हणतात,बाळशास्त्री हरिदास यांच्या घरातील सदस्या कडून हंडी फोडली जाते व काल्याचे पुढचे मार्गक्रमण नामदास महाराजां कडून केले जाते. आषाढीला नामदास परिवारातील सर्व सदस्य काल्यास हजेरी लावतात तर कार्तिकीस संत नामदेवरायांची दिंडी आळंदीला जाते मात्र नामदास महाराज महाद्वारकाल्याची परंपरा पूर्ण करूनच आळंदी कडे प्रस्थान करतात हे विशेष.
ज्याप्रमाणे हरिदास परिवार ज्या श्रद्धेने महाद्वारकाला करतो त्याच श्रद्धेने नामदास परिवार ही परंपरा चालवीत आहे. यामुळेच हरिदास व नामदास परिवाराचे नाते अतूट आहे.
श्रीकांत हरिदास

