महुद प्रतिनिधी
सध्या पाऊस लांबणीवरती पडल्यामुळे व धरण क्षेत्रात पाऊस नसल्याने राजेवाडी धरणातील राखीव पाणी साठा सुध्दा कमी झालेला आहे.त्याचा परिणाम कटफळ मधील तलावात बिल्कुल पाणी नसल्याने कटफळ भागात पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची समस्या बिकट झाली आहे.कटफळ ग्रामस्थांनी राजेवाडीचे पाणी तलावात सोडण्यासाठी आंदोलन केले होते.तरीसुध्दा पाणी सोडले गेले नाही.
पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी कटफळ येथील नागरिकांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.व संमंधीत अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती कथन करुन पाणी सोडण्यासाठी विनंती केली.जरी राजेवाडी तलावात पाण्याची पातळी कमी असली तरी पिण्याच्या पाण्यासाठीचा जो राखीव कोटा आहे. त्यातील पाणी सोडण्याची मागणी केली.व जर या नागरीकांना पाणी नाही मिळाले तर उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा संकल्प डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी अधिकाऱ्यांना बोलुन दाखवला.
परिणामी अधिकारीवर्गांनी सहकार्याची भावना दाखवत राजेवाडी तलावातील पाणी कटफळ तलावात सोडणयस सुरवात केली असल्याचे मत पुरोगामी युवक संघटनेचे कटफळ गावचे अध्यक्ष बाळासाहेब खरात-पाटील यांनी सांगितले

