युवा शेतकरी हनुमंत शितोळे यांच्या केळीची निर्यात ः पाच एकर केळी बागेतून भरघोस उत्पन्न ः ७० टन केळीची निर्यात तर २२५ टन एकुण केळची अपेक्षा
पंढरपूर प्रतिनिधी
भारत हा कृषी प्रधान देश असून जगातील अनेक देशांमध्ये भारताचे अन्नधान्य निर्यात होत असते. त्यामुळे देशातील शेती प्रयोगशिलतेचे कौतुक होत असून यामध्ये ग्रमीण भागातील अनेक प्रयोगशील शेतकर्यांचा मोठा वाटा असल्याचे दिसून येत आहे. याचीच प्रिचत पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील युवा शेतकरी हनुमंत भारत शितोळे यांच्या माध्यमातून आली असून त्यांची केळी पिकाला इरान देशामध्ये मोठे मार्केट मिळाले आहे. यामुळे या युवा शेतकर्यांच्या केळीच्या यशस्वी प्रयोगाला महत्व प्रप्त झाले आहे.
याबाबत शेतकरी हनुमंत शितोळे म्हणाले की जी९ या जातीच्या केळीची २ ऑगस्ट २०२२ रोजी पाच एकर क्षेत्रावर लागवड केली. यासाठी दोन ओळीतील अंतर सहा फुट तर दोन रोपांमधील आंतर पाच फुट धरले. तर लागवडीपुर्वी एकरी सहा डंपिंग शेणखत व कांदा विस्कटला होता. त्यानंतर सुमारे २० ते २५ दिवसांनी केळीची लागवड केली. त्यानंतर केळीच्या रोपांची पांढरी मुळी चालावी यासाठी ह्युमीक ॲसीड सोडण्याचे नियोजन केले होते.
पीकशास्त्राच्या दृष्टीकोनातून केळी पीकाला योग्य जीवनद्रव्ये मिळविण्यासाठी सुक्ष्म नियोजनाची गरज असते. त्यानुसार लागवडी नंतर काही दिवसांनी केळीची वाढ व्हावी यासाठी दर आठ दिवसाला १९ः१९ ची फवारणी करण्यात आली. त्यानंतर पीकाच्या संरक्षणासाठी बुरशीनाशके व किटकनाशकांची अवश्यकतेनुसार फवारणी केली. तरी लागवडीस तीन महिने पुर्ण झाल्यानंतर पावर ट्रीलरच्या सहय्याने बांधणी करून बेलस्ट डोस देण्यात आला. त्यानंतर सलग दोन महीने प्रत्येक आठ दिवसांनी एकरी पाच किलो याप्रमाणे १३ः०ः४५ ड्रीपव्दारे सोडले. या सर्व नियोजनबध्द औषध सोडण व फवारणीमुळे केळीच्या झाडांना बळकटी येवून त्यांची वाढ चांगल्या प्रकारे झाली.
केळीची वेण होताना ड्रोनव्दारे फवारणी करून पीकाची रोगराईपासुन संरक्षण केले. त्यानंतर केळीची फळ फुगणे व चकाकी येण्यासाठी एकरी पाच किलो प्रमाणे ०ः६०ः२० ची मात्र सोडली. या सर्व खतमात्रा दिल्यामुळ केळीच्या घडांची वाढ योग्य व वेगाने होण्यास मदत झाली. सध्या बागेमध्ये ३२ ते ४० किलो वजनाचे घड आहेत. तर ५५ किलो वजनाचा सर्वात मोठा घड बागेमध्ये उत्पादीत झाला आहे.
आतापर्यंत तेरा लाखाचे उत्पन्न, तीस लाखाची अपेक्षा......
पाच एकर केळी बागेतून निवडून आतापर्यंत ७० ते ८० टन केळी बाजारात पाठवीली आहे. त्यास सुमारे १७ ते २० रूपये प्रित किलो प्रमाणे दर मिळाला आहे. यापैकी सुमारे ७० टन केळी ही इरानच्या बाजारपेठेमध्ये पाठवीली असून त्यास तेथे चांगली बाजारपेठ मिळाली आहे. यातुन आतापर्यंत सुमारे १३ ते १४ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर बागेमध्ये अद्यापही भरपूर केळी शिल्लक असून सुमारे २२५ टन एकुण केळी या पाच एकराच्या केळी बागेतून उत्पादन मिळेल अशी अपेक्षा असून सुमारे तीस लाख उत्पन्न मिळण्याची अपेक्षा शेतकरी हनुमंत शितोळे यांना आहे.
चांगले भरघोस उत्पन्न देणारे पीक.....
शेतकर्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी केळी हे उत्तम पीक असून ऊसापेक्षाही दुप्पट, तीपट्ट उत्पन्न यामध्ये मिळु शकते. यासाठी शेतकर्याच्या सकारात्मक मानसिकतेची गरज असून थोडे नियोजनाचे कष्ट जास्त घेतल्या केळी पीकाचे उत्पादन वाढीचा प्रयोग यशस्वी होण्यास कोणतीही हारकत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकर्यांनी केळी पीकाकडे ओळावे.
हनुमंत भारत शितोळे
केळी उत्पादक शेतकरी,रोपळे ता.पंढरपूर

