पंढरपूर प्रतिनिधी
मुळचे पंढरपूर येथील रहिवासी बाळकृष्ण(कृष्णा) पांडुरंग हरिदास (६७) यांचे वापी येथे आषाढी एकादशी दिवशी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दु:खद निधन झाले. त्यांच्यावर पंढरपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेसाठी विविध संस्था, संघटना व हरिदास परिवारातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ते महाराष्ट्र मित्रमंडळ (वापी,गुजरात) चे माजी अध्यक्ष होते. तेथील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान होते.अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांचे ते जेष्ठ बंधु होत. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, पत्नी,मुलगा, मुलगी,जावई नातू असा मोठा परिवार आहे.

