ईगतपुरी तालुका -प्रतिनिधी- नवनाथ गायकर
नाशिकरोड येथील सामाजीक कार्यात अग्रेसर असणार्या रोटरी क्लब या संस्थेने ग्रामीण भागातील माध्यमीक शाळांमधील मुले व मुली यांच्या शासकीय निधीअभावी होणार्या स्वच्छतागृहाचीं परवड लक्षात घेत मदतीचा हात पुढे केला आहे. असाच मदतीचा हात पुढे करत आहुर्ली ता.ईगतपुरी येथील न्यु इंग्लिस स्कुल या माध्यमीक शाळेतील विदयार्थ्याच्या सोईसाठी स्वच्छतागृहे बांधुन तथा उपलब्ध करुन दिली आहे. या कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा नुकताच आहुर्ली माध्यमीक शाळेत संपन्न झाला आहे.
या वेळी कै. चव्हाण व कै.दयाराम चव्हाण यांचे स्मृतीनिमित्त दिनेश सराफ यांनी शाळेला हात स्वच्छ करणेसाठीचे साहित्य तथा स्टेशन ही रोटरी क्लब नाशिकरोड यांचे माध्यमातुन प्रदान केले आहे.
याकामी नाशिकरोड रोटरी क्लब अध्यक्ष श्रीमती वर्षा जोशी, सचिव ज्ञानेश वर्मा,धनंजय जोशी, विभा पाटिल, फिरदोस कपाडिया, दिलीप दिघे, शंकर ठुबे, एड. दिनेश शिंदे, दिनेश सराफ आदीनीं योगदान दिले आहे.
लोकार्पण सोहळयाप्रसंगी नाशिकरोड रोटरी क्लब चे सर्व वरील पदाधिकारी, माध्यमीक शाळेतील शिक्षक, पालक व विदयार्थी हजर होते.

