विशेष लेख
आज शहर म्हटले विविध पायाभूत आणि मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणारे ठिकाण म्हटले जाते. तेथे शैक्षणिक, आरोग्य,औद्योगिक वसाहती, मनोरंजन, उंचच्या उंच टोलेजंग इमारती,विविध प्रकारच्या वाहतूकही सुविधांचे जाळे विकसित केलेले असते, तंत्रज्ञान , मनोरंजन, भव्य दिव्य क्रीडांगणे,हाॅटेल्स,लाॅजेस, योग्य पाणीपुरवठा,अखंडित वीजपुरवठा पाहावयास मिळतो.एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्यामुळे साहाजिकच तो प्रदेश किंवा ते शहर लोकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
त्यामुळे ग्रामीण तसेच इतर शहरी भागातील कुशल व अकुशल लोकांचे लोंढेच्या लोंढे शहराकडे स्थलांतर करू लागले आहेत.त्यामुळे साहाजिकच शहरांच्या लोकसंख्येबरोबर अनेक पायाभूत सुविधावर प्रचंड प्रमाणात ताण निर्माण होऊ लागला आहे.
त्यामुळे भविष्यात वाढलेली लोकसंख्या आणि त्यांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा राक्षसच लोकांच्या मानगुटीवर बसू नये. म्हणजे बस...
आज शहरे अतिशय वेगाने वाढू लागले आहेत. ही शहरे वाढत असताना शहरी भागातील आपत्ती व्यवस्थापन विभाग व विविध विभागांचे अधिकारी झोपेचे सोंग व पैशाची ( अ.....ची )गोळी खाऊन झोपेचे सोंग घेऊन शहरांना अक्राळविक्राळ रूप देऊ लागले आहेत.त्यामुळे अनेक मनोरंजनाची ठिकाणे तसेच लहान मुलांच्या हसण्या बागडण्याच्या ठिकाणावर कुऱ्हाड कोसळली आहे.
शहरांच्या होत चाललेल्या विद्रुपीकरणामुळे अनेक समस्यांना येत्या कालावधीत तोंड द्यावे लागणार आहे.अतिक्रमणे हा तर सर्वात मोठा लोकशाहीतील राक्षस आहे.तो कधी कोणाच्या बोकांडी बसेल सांगता येत नाही.त्यामुळे संबंधित खात्याचे मंत्री,पोलिस,आपत्ती व्यवस्थापन विभाग व प्रशासन विभाग यांना योग्य वेळी जाग आली,तर बरे होईल.नाही तर राक्षसी वृत्तीच्या नियोजनामुळे अनेक लोकांना जीव मुठीत घालून जगावे लागेल.
भ्रष्ट व्यवस्था आणि पैसा खाणारा राक्षस, नैसर्गिक टेकड्या, पठार, पर्वत,जंगले ,ओढे,नाले,नद्या, खाड्या बुजवून, नष्ट करून, नैसर्गिक प्रवाह बंद करून कोणता विकास साधत आहेत.हे कळण्यापलिकडे आहे.त्यापेक्षा विविध पायाभूत सुविधांचे विकेंद्रीकरण करून त्याचे जाळे संपूर्ण प्रदेशभर विकसित केले तर समोर ठाण मांडून बसलेल्या राक्षसाला आपण जरूर चितपट करू शकू...नैसर्गिक पाण्याची दिशा बदलून निसर्गावर चालू असलेला सततचा अन्याय ,अत्याचार आहे.
शहरी भागात मोठ्या प्रमाणात विकासाच्या नावाखाली चाललेला प्रचंड मोठा ,अगणित होणारा भ्रष्टाचार थांबू शकला नाहीतर शहरी भागातील जाणकार विकासाच्या नावाखाली शहरांची कुटुंबाच्या विकासासाठी अशीच लुट करीत राहिले तर तो ग्रामीण भागावर अत्याचार ठरेल.
वेळीच सुधारा नाहीतर अस्ताव्यस्त वाढत चाललेली शहरीकरण दहशतवादी लोकांचे केंद्रबिंदू , अड्डे ठरू नये म्हणजे बरे.जेव्हा शहरी भागातील वसाहतीतील रस्ते भव्यदिव्य होणार नाहीत.योग्य प्लॅनिंगने वसाहती उभारणार नाही. तोपर्यंत नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती ही शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाची मोठी समस्या ठरेल.
शहरी भागात वाढत चाललेली गुन्हेगारी,ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागाच्या भू - संपादनासाठी होणार नाही. याची काळजी संबंधित व्यवस्थेने योग्य वेळीच घेतलेली बरी.लोकसंख्या वाढेल तसा लोकांच्या जीवावर उठणारा राक्षस अक्राळविक्राळ रूप धारण करून खूप मोठा झालेला असेल.तेव्हा विचार करण्यास संधीच नसेल.. त्यामुळे योग्य प्रकारे भूमीचा वापर होणे काळाची गरज आहे.विकासाच्या नावाखाली चाललेली नैसर्गिक व मानवनिर्मित संसाधनांचा योग्य आणि काळजी पूर्वक वापर होणे गरजेचे आहे.
प्रा.आनंदा आलदर

